वॉशिंग्टन, अमेरिका :

अमेरिकेकडून जाहीर करण्यात आलेल्या ‘कुप्रसिद्ध बाजारांच्या’ यादीत भारतातील पाच बाजारांचा समावेश आहे. यामध्ये दिल्लीतील लोकप्रिय ‘पालिका बाजार‘ मार्केटमध्ये आढळणाऱ्या ‘सेकंड कॉपी’ वस्तूंचाही अमेरिकेकडून निषेध केलाय. हा बाजार बनावट ट्रेडमार्क आणि कॉपीराईटसाठी ओळखला जात असल्याचंही अमेरिकेनं म्हटलंय. (notorious market list)

अमेरिकेनं ‘नोटोरियस मार्केट’ म्हणून घोषित केलेल्या बाजारांत भारतातील लोकप्रिय ई-कॉमर्स वेबसाईट ‘इंडियामार्ट डॉट कॉम‘ (Indiamart.com), दिल्लीतील पालिका बाजार (Palika Market), मुंबईतील हीरा पन्ना बाजार, कोलकातातील किदरपूर आणि दिल्लीतील टँक रोड या बाजारांचाही समावेश आहे.

‘यूएस ट्रेड रिप्रेझेंटेटिव्ह’नं (USTR) प्रसिद्ध केलेल्या जगातील कुख्यात बाजारांच्या ताज्या वार्षिक यादीत या बाजारांचा समावेश करण्यात आला आहे.

‘बनावट आणि पायरेटेड वस्तूंचा जागतिक व्यापार अमेरिकन नवकल्पना आणि सर्जनशीलतेला आणि अमेरिकन कामगारांना हानीकारक ठरतो’ असं यूएस व्यापार प्रतिनिधी कॅथरीन थाई यांनी म्हटलंय.

False Flag Operation: युक्रेनमध्ये गाडीचा अचानक स्फोट; रशियाचं ‘फॉल्स फ्लॅग ऑपरेशन’ सुरू?
Singapore PM: सिंगापूर पंतप्रधानांकडून नेहरुंचं गुणगान; संसदेतील ‘आरोपी’ सदस्यांवर टिप्पणी
IndiaMart.com बनावट वस्तूंच्या विक्रीसाठी सर्वोत्तम पद्धतींचा अवलंब करण्यात अयशस्वी ठरल्याची प्रतिक्रिया अमेरिकेच्या ‘युनायटेड स्टेट्स ट्रेड रिप्रेझेंटेटिव्हज’नं व्यक्त केलीय. यामध्ये विक्रेत्याची पडताळणी, बनावटींवर दंड आकारणे आणि बनावट वस्तूंचं निरीक्षण करणं अशा काही पद्धतींचा समावेश आहे.

या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर नोटीस देणं आणि वस्तूंची विक्री थांबवणं यांसारख्या कोणत्याही उपाययोजना नाहीत, असंही म्हटलं गेलंय.

दिल्लीतील भूमिगत उभारण्यात आलेला ‘पालिका बाजार’ मोबाइल अॅक्सेसरीज, मेकअपच्या वस्तू, घड्याळं आणि चष्म्याच्या ‘सेकंड कॉपी’ विक्रीसाठी अगोदरपासूनच कुप्रसिद्ध आहे. आता या बाजारानं अमेरिकेच्या कुप्रसिद्ध बाजारांच्या यादीतही स्थान मिळवलंय. विद्यार्थी, तरुण आणि पर्यटकांमध्ये स्वस्त वस्तू मिळण्याचं लोकप्रिय ठिकाण म्हणून ‘पालिका बाजार’ ओळखलं जातं.

Bharat Ratna Lata Mangeshkar: लतादिदींना दोहावासियांकडून संगीतमय श्रद्धांजली
PM Imran Khan: ‘नवाझ शरीफांबद्दल पाकिस्तान सरकारकडून सर्वात मोठी चूक’, इम्रान खान यांचं वक्तव्य

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here