औरंगाबाद न्यूज लाइव्ह: धक्कादायक! मुलाने आईलाच प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत पाहिलं; यापुढे जे घडलं ते वाचून हादराल – aurangabad murder news boy saw his mother in an unwanted state with her lover
औरंगाबाद: वैजापूर तालुक्यातील खंडाळा गावात नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली असून, प्रेमात अडसर ठरणाऱ्या ९ वर्षांच्या मुलाचा आईनं प्रियकराच्या मदतीने खून केल्याचं समोर आले आहे. सार्थक रमेश बागूल (९) असे मृत मुलाचे नाव आहे. तर संगीता रमेश बागूल (३५) व तिचा प्रियकर साहेबराव माणिकराव पवार (५२) अशी आरोपींची नाव आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वैजापूर तालुक्यातील तलवाडा शिवारातील जंगलातल्या दरीत १७ फेब्रुवारीला पोलिसांना एक अनोळखी व्यक्तीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत मिळून आला होता. दरम्यान वैजापूर पोलीस ठाण्यात ११ फेब्रुवारी रोजी संगीता रमेश बागूल यांनी आपल्या मुलाची अपहरणाची नोंद केली होती.त्यामुळे पोलिसांनी सापडलेल्या मृतदेहासोबतचे कपडे आणि इतर गोष्टी दाखवताच संगीता यांनी आपलाच मुलगा असल्याचं सांगितले. पण ओळख पटली असली तरी खुनाचा आरोपी शोधण्याचे पोलिसांसमोर आव्हान होते. थकित पाणीपट्टी २६ कोटींची; पण पालिकेने भरले फक्त ५० लाख पण पोलिसांनी तपास सुरू करताच त्यांना हा खून आईनेच केल्याचा संशय आला आणि त्यांनी आईला ताब्यात घेतलं असता, मुलाने आपल्याला प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले होते. त्यामुळे आपल्या प्रेमात अडसर ठरू नयेत म्हणून,प्रियकर साहेबराव माणिकराव पवार याच्या मदतीने मुलाचा खून केल्याची कबुली दिली.
अन् पोलिसांना संशय झाला….
पोलिसांना अगोदरच मुलाच्या आईवर संशय होता. मुलाचे प्रेत पाहूनसुद्धा तिला रडू आले नाही. तसेच अपहरणाचा गुन्हा दाखल करताना तिच्या चेहऱ्यावर कुठलीही दुःखाची भावना पोलिसांना जाणवली नाही. त्यामुळे संगीता बागूल हिला पोलिसांनी त्याब्यात घेऊन खाक्या दाखवताच तिने कबुली दिली.