मुंबई महानगरपालिकेत जो भ्रष्टाचार, दुराचार, अनाचार पहायला मिळतो आहे तो महाराष्ट्रातच काय देशातही कुठे इतका भ्रष्टाचार घडला नसेल, असे मला वाटते. अक्षरशः आपण ज्याला निर्लज्जता म्हणतो तसा निर्लज्जतेने भ्रष्टाचार होतोय.

देवेंद्र फडणवीस
हायलाइट्स:
- मुंबई महानगरपालिकेतील सत्ताधाऱ्यांच्या पाठी कॅगचा ससेमिरा लागण्याची चर्चा
- केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईमुळे अगोदरच हैराण झालेल्या शिवसेनेच्या अडचणीत भर पडण्याची शक्यता
यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसंदर्भात भाष्य केले. शिवसेना निवडणुकीच्या काळात महाराष्ट्राची अस्मिता आणि भावनिक मुद्दे उपस्थित करु शकते. पण त्यांच्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी विधानसभेत करण्यात येईल, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. मुंबईतील काही रस्ते चांगले असूनही त्यांची नव्याने कंत्राटे काढण्यात आल्याचा आरोपही देवेंद्र फडणवीस यांनी केला. जिथं काँक्रिट रोड आहे तिथं डांबरी रोडचा ठेका दिलेला आहे. जेथे चांगला डांबरी रोड आहे त्या ठिकाणी पुन्हा रस्ता बनवण्याचं कंत्राट देण्यात आले आहे. विशेष कॅग ऑडिटशिवाय हा भ्रष्टाचार लोकांना समजणार नाही, असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
या बातम्यांबद्दल अधिक वाचा
Web Title : bjp leader devendra fadnavis demand cag audit of mumbai bmc corruption shivsena may oppose
Marathi News from Maharashtra Times, TIL Network
Marathi News from Maharashtra Times, TIL Network