ठाकरे सरकारने आमच्या जुहूतील बंगल्यासंदर्भात नोटीस धाडली आहे. यावरुन शिवसेना आणि उद्धव ठाकरे राणेंना किती घाबरते, हे दिसून आले आहे. एवढ्या खालच्या थराचं राजकारण महाराष्ट्रात आजपर्यंत कोणीही केलं नव्हतं आणि यापुढेही कोणी करेल असं वाटत नाही.

 

Nilesh Rane Uddhav

निलेश राणे आणि उद्धव ठाकरे

हायलाइट्स:

  • कुठल्या थराला जाऊन राजकारण करायचं याला मर्यादा असते
  • महाराष्ट्रातले बाकी सगळे प्रश्न सुटले फक्त राणे आणि किरीट सोमय्या हेच उरले आहेत
सुरेश कोलगेकर, सिंधुदुर्ग: ठाकरे सरकारला राजकारणातील सर्व मर्यादांचा विसर पडला आहे. मात्र, सत्तेत आल्यानंतर या सर्वाचा हिशेब आम्ही चुकता करू, असा इशारा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे पूत्र निलेश राणे यांनी दिला. शिवसेना आणि भाजप नेत्यांमध्ये सध्या आरोप प्रत्यारोपांचा ‘सामना’ सुरु आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या आरोपांना शिवसेना नेते पत्रकार परिषद घेऊन प्रत्युत्तर देत आहेत. या वादात आता निलेश राणे यांनीही उडी घेतली आहे. ते शनिवारी सिंधुदुर्गात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

यावेळी निलेश राणे यांनी ठाकरे सरकारवर जोरदार हल्ला चढवला. ठाकरे सरकारने आमच्या जुहूतील बंगल्यासंदर्भात नोटीस धाडली आहे. यावरुन शिवसेना आणि उद्धव ठाकरे राणेंना किती घाबरते, हे दिसून आले आहे. एवढ्या खालच्या थराचं राजकारण महाराष्ट्रात आजपर्यंत कोणीही केलं नव्हतं आणि यापुढेही कोणी करेल असं वाटत नाही. उद्धव ठाकरे हे विसरलेत की ते सातत्याने त्या खुर्चीवर बसायला आलेले नाहीत. आज खुर्ची तुमच्याकडे आहे उद्या आमच्याकडे असेल हे लक्षात ठेवा. त्यामुळे हिशोब चुकते हे याच जन्मात केले जातील, तुम्हाला सोडणार नाही, असा इशारा निलेश राणे यांनी दिला.
दिशा सालियनवर बलात्कार होत असताना फ्लॅटबाहेर कोणत्या मंत्र्याचे सुरक्षारक्षक होते; नारायण राणे यांचा सवाल
कुठल्या थराला जाऊन राजकारण करायचं याला मर्यादा असते. मात्र हे ठाकरे सरकार मर्यादा विसरले. महाराष्ट्रातले बाकी सगळे प्रश्न सुटले फक्त राणे आणि किरीट सोमय्या हेच उरले आहेत. लोक यांना आपटल्याशिवाय राहणार नाही. हे जे काही नोटीसचं नाटक चालवलय ते आज ना उद्या संपेल. कारण त्यात अनधिकृत काही नाही. अशा खूप तक्रारी आल्या आणि गेल्या. पण राणेंचं कोणी काही उखाडू शकले नाहीत आणि कधी उखडणार नाहीत. मात्र आम्ही एक ना एक दिवस कसं उखडतात ते दाखवून देऊ, असेही निलेश राणे यांनी म्हटले.
‘दिशा सालियनवर लैंगिक अत्याचार झालाच नाही, तरीही राणे तिची बदनामी करतायत; महिला आयोगानं लक्ष घालावं’
‘दुसरा कोणी असता तर अशा परिस्थितीत पदावर राहिला नसता’

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जुहू येथील घरात अनधिकृत बांधकाम झाल्याचं सांगत महापालिकेनं त्यांना नोटीस बजावल्यामुळं पुन्हा एकदा शिवसेना विरुद्ध नारायण राणे सामना रंगला आहे. राणे यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला होता. उद्धव ठाकरे यांना आता जे मिळालंय ती केवळ बाळासाहेबांची पुण्याई आहे. कुठलीही गुणवत्ता आणि पात्रता नसताना ते सव्वा दोन वर्षे मुख्यमंत्रीपदावर आहेत. स्वत:च्या ताकदीवर उभं राहता येत नाही. उभं राहायचं असेल तर दोन माणसं लागतात. मी कोणाच्या आजारपणावर बोलणार नाही, पण दुसरा कोणी माणूस असता तर पदावर राहिला नसता, असा जोरदार टोला राणेंनी उद्धव ठाकरे यांना हाणला होता.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : nilesh rane slams cm uddhav thackeray and shiv sena
Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here