पिंपरी: नवी दिल्लीतील निजामुद्दीन मरकजबद्दल फेसबुकवर पोस्ट टाकणं एकाला महागात पडलं आहे. मरकजबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याबद्दल एका तरुणावर भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संदेश शेंडगे असं या तरुणाचं नाव आहे. तो भोसरीतील कासारवाडी येथे राहतो. एका व्यक्तीने दिल्ली येथील निजामुद्दीन मरकज प्रकरणाबाबत सोशल मीडियावर एक पोस्ट टाकली होती. त्या पोस्टवर या तरुणाने आक्षेपार्ह कमेंट लिहिली होती. या कमेंटमुळे मुस्लिम समाजातील लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या. याबाबत पोलिसांनी पुढाकार घेऊन गुन्हा दाखल केला आहे. पोलीस नाईक विनायक वर्पे यांच्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी भोसरी पोलीस अधिक तपास करत आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.

दिल्लीत तबलीगी जमातने नुकत्याच एका धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात हजारो लोक सहभागी झाले होते. यातील काही लोक करोनाबाधित होते. त्यांचा संसर्ग एकमेकांना झाल्याचं सूत्रांनी सांगितलं. या कार्यक्रमात महाराष्ट्रातील अनेक लोकही सहभागी झाले होते. या कार्यक्रमानंतर महाराष्ट्रात आलेल्या या लोकांना आरोग्य यंत्रणेने शोधून काढलं असून त्यांची तपासणी करण्यात येत आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here