मुंबई : भारतीय शेअर बाजारमधील बिग बुल पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. यावेळी त्यांनी शेअर बाजारात काही मिनिटांत १८६ कोटींची कमाई केल्याची चर्चा आहे. समूहाच्या आणि टायटनच्या शेअर्समध्ये झालेल्या वाढीमुळे ते मालामाल झाले आहेत. १५ फेब्रुवारी २०२२ रोजी शेअर बाजार सुरू झाल्यानंतर १० मिनिटांच्या आत टायटनच्या शेअरमध्ये ३७ रुपयांची वाढ झाली. तर टाटा मोटर्सचा शेअर बाजार उघडताच ४.८० रुपयांनी वाढला.


टायटनने स्टॉक एक्स्चेंजला दिलेल्या माहितीनुसार, राकेश झुनझुनवाला आणि त्यांची पत्नी रेखा झुनझुनवाला यांच्याकडे टायटनचे ४,५२,५०,९७० शेअर्स किंवा डिसेंबर तिमाहीच्या अखेरीस कंपनीमध्ये ५.०९ टक्के हिस्सा होता.टायटनच्या तेजीचा फायदा
हा देशातील सर्वात मोठा ज्वेलरी ब्रँड आहे. डिसेंबर तिमाहीच्या आकडेवारीनुसार, राकेश झुनझुनवाला ३.५७ कोटी शेअर्स आणि त्यांच्या पत्नीकडे ९५.४० लाख शेअर्स आहेत. १५ फेब्रुवारी २०२२ रोजी टायटनमध्ये ३७ रुपयांच्या वाढीनुसार राकेश झुनझुनवाला यांनी १६७.२४ कोटी रुपयांचा नफा कमावला आहे.


टाटा मोटर्समध्येही मोठा हिस्सा
शेअर बाजारातील दिग्गज राकेश झुनझुनवाला यांच्याकडेही टाटा मोटर्समध्ये १.१८ टक्के हिस्सा किंवा ३.९३ कोटी शेअर्स आहेत. त्यांनी ४.८० रुपयांच्या वाढीच्या आधारे १८.८६ कोटी रुपयांचा नफा कमावला आहे. झुनझुनवाला यांचा दोन्ही शेअर्समधील नफा एकत्र केला, तर त्यांना सुमारे १८६ कोटी इतका नफा झाला आहे.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here