सिंधुदुर्ग: राज्याचे पर्यटनमंत्री आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर अपेक्षेप्रमाणे राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. मंत्री झाल्यापासून गेल्या अडीच वर्षात आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांना सिंधुदुर्ग आणि कोकणाची आठवण झाली नाही. मग आज ते भावाला देण्यासाठी नवीन खेकडा सापडतोय का, हे पाहायला सिंधुदुर्गात येत आहेत का, असा खोचक सवाल भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी उपस्थित केला. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे कोकण हा शिवसेनेचा कणा असल्याचे सांगायचे. मग आदित्य ठाकरे यांना अडीच वर्षांनी कोकणाची आठवण कशी आली? करोनाच्या काळात पर्यटनाचे केंद्र असलेल्या सिंधुदुर्गात स्कुबा डायव्हिंग आणि इतर व्यवसाय करणाऱ्यांचे हाल झाले. तेव्हा राज्य सरकारने या व्यावसायिकांना कोणतीही मदत केली नाही. मग आदित्य ठाकरे आता फक्त फोटो काढायला आणि फिरायला येत आहेत का? आदित्य ठाकरे अर्थमंत्र्यांच्या गाडीत बसून फिरतात. मग त्यांनी सिंधुदुर्गातील व्यावसायिकांसाठी एखादे आर्थिक पॅकेज तरी जाहीर करावे, अशी मागणी नितेश राणे यांनी केली. ते सोमवारी सिंधुदुर्गात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
Tejas Thackeray: उद्धव ठाकरे-केसीआर भेटीवेळचा तेजस ठाकरे यांचा फोटो व्हायरल, चर्चांना उधाण
यावेळी नितेश राणे यांनी शिवसेनेवर सडकून टीका केली. चिवला समुद्रकिनाऱ्यावरील निलरत्न बंगल्याविषयी आमच्या हातात कोणतीही नोटीस आलेली नाही. त्यामुळे ही नोटीस खरंच केंद्रातून आली आहे किंवा राज्यातील पर्यावरण खात्यानेच या कुरापती केल्या आहेत का, याचा आम्ही शोध घेत असल्याचे नितेश यांनी म्हटले. आदित्य ठाकरे पर्यटनमंत्री झाल्यानंतर अडीच वर्षांनी स्वतंत्रपणे कोकणाच्या दौऱ्यावर येतात. ते आमचा बंगला तुटला की नाही, हे पाहण्यासाठी तर आले नाहीत ना, असा खोचक सवालही नितेश राणे यांनी उपस्थित केला.

महापालिकेचं पथक पोलीस संरक्षणात नारायण राणे यांच्या बंगल्यावर दाखल

‘सर्वांदेखत मुठी आवळून दाखवतात घरी जाऊन बेडवर झोपतात’

नितेश राणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केसीआर यांच्या भेटीसंदर्भातही टिप्पणी केली. उद्धव ठाकरे हे इतर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना भेटतात. पण आधी त्यांनी राज्यातील नेत्यांना भेटावे. उद्धव ठाकरे मुठी आवळून दाखवतात, आपली तब्येत व्यवस्थित असल्याचे सांगतात. पण घरी जाऊन बेडवर झोपतात, असे नितेश राणे यांनी म्हटले.

नितेश राणेंचा संजय राऊत यांना टोला

संजय राऊत यांनी पुढच्यावेळी आपल्या भावाला भांडुपमधून निवडून आणून दाखवाले. संजय राऊत शिवसेनेच्या विस्तारासाठी नागपूरमध्ये गेले आहेत. पण ज्या नेत्याने आयुष्यात एकही निवडणूक लढवली नाही त्याने कुठेही विशेष लक्ष घातले, तरी काय फरक पडणार आहे? बेळगावमध्येही संजय राऊत यांनी विशेष लक्ष घातले होते, तिकडे काय झाले, असा सवाल नितेश राणे यांनी विचाराल. तसेच मुंबईतील अधीश बंगल्यावर महापालिकेकडून सुरु असलेल्या कारवाईसंदर्भातही नितेश यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. नारायण राणे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या रक्षणासाठी जीव पणाला लावला होता. आज शिवसेनेकडून त्यांचेच घर तोडण्याचा प्रयत्न सुरु आहे. ही बाब जुन्या शिवसैनिकांना रूचलेली नाही, असेही नितेश राणे यांनी म्हटले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here