दोन आठवड्यांपूर्वी दिल्लीत तबलिगी जमातचे धार्मिक संमेलन झाले होते. या संमेलनात महाराष्ट्रातील भाविकांनी सहभाग नोंदविला होता. जिल्ह्यातील एक जण या संमेलनात सहभागी होवून परत आल्याचा संशय जिल्हा प्रशासनाला आला होता. त्यामुळे खबरदारी म्हणून त्या व्यक्तीला जिल्हा सामान्य रुग्णालयातील विलगिकरण कक्षात ठेवण्यात आले होते. त्यानंतर त्याचे ‘थ्रोट स्वॅब’ तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. आज, त्याच्या ‘थ्रोट स्वॅब’चा पॉझिटीव्ह अहवाल प्राप्त झाला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. त्यामुळे जिल्हा प्रशासन सतर्क झाले असून हा तरुण दिल्लीतून आल्यानंतर कुणाकुणाच्या संपर्कात आला होता, याचा शोध घेतला जात आहे. तसेच या तरुणाच्या कुटुंबीयांना आणि त्याच्या शेजाऱ्यांना होम क्वॉरंटाइन केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
अमरावतीत झाडाझडती
दरम्यान, अमरावतीत आज ३३७० लोकांची तपासणी करण्यात आली. या लोकांना होम क्वॉरंटाइन करण्यात आले आहे. यातील १२३ लोकांचे थ्रोट स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यापैकी ९१ जणांचे स्वॅब रिपोर्ट निगेटिव्ह आले असून २१ जणांचे रिपोर्ट प्रलंबित आहेत.
पुण्यात एकाच दिवशी ११ रुग्ण
पुण्यातील करोना रुग्णांची संख्याही थांबताना दिसत नाही. जिल्ह्यात आज ११ नवीन करोनाबाधित रुग्ण आढळले असल्याने पुण्यातील रुग्णांची संख्या ७१ झाली आहे. काल ही संख्या ६० होती. काल रात्री उशिरा दोन आणि आज दिवसभरात नऊ रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्याने ही संख्या ७१ झाली आहे, अशी माहिती पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times