मुंबई:मुंबई महापालिकेच्या (BMC) अधिकाऱ्यांच्या एका पथकाने सीआरझेड नियमांच्या उल्लंघनाच्या आरोपांबाबत सोमवारी केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्या मुंबईतील जुहू परिसरात असलेल्या बंगल्याची पाहणी केली. सूत्रांच्या माहितीनुसार, या बंगल्यात नारायण राणे यांच्या उपस्थितीत पालिकेच्या पथकाने तब्बल दोन तास पाहणी केली. यावेळी ‘अधिश’ बंगल्यावर पोलीस संरक्षण ठेवण्यात आले होते.

मुंबई महापालिकेचे काही अधिकारी पोलीस कर्मचाऱ्यांसमवेत सकाळी जवळपास ११ वाजताच्या सुमारास नारायण राणेंच्या बंगल्याच्या परिसरात पोहोचले. सूत्रांनी सांगितले की, त्यांनी बंगल्याच्या परिसरात काही फोटो घेतले आणि मोजणीही केली. तसेच विविध कागदपत्रांची तपासणीही केली. त्यानंतर राणे यांच्यासमवेत चर्चा केल्याचेही सांगण्यात येत आहे.

Narayan Rane : नारायण राणे यांना मुंबई महापालिकेनं बजावली नोटीस
Mumbai Local : मुंबई लोकल प्रवाशांसाठी महत्वाची बातमी; लससक्तीच्या आदेशावर हायकोर्ट म्हणाले…

मुंबईच्या पश्चिम उपनगरात असलेल्या जुहू येथील बंगल्यात प्रवेश करण्याआधी महापालिकेच्या अधिकाऱ्यांचे एक पथक पोलीस संरक्षण घेण्यासाठी सांताक्रूज पोलीस ठाण्यात गेले होते. त्यानंतरच त्यांनी बंगल्यात प्रवेश केला. या पाहणीबाबत के वेस्ट वॉर्डच्या सहायक आयुक्तांकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

तत्पूर्वी, महापालिकेच्या पथकाने शुक्रवारी संध्याकाळीही ‘अधिश’ बंगल्याला भेट दिली होती. मात्र, तिथे राणे कुटुंबीयांपैकी कुणीही उपस्थित नसल्याने पथकाने कोणतीही कार्यवाही न करता परत जावे लागले होते.

आदित्य ठाकरे भावासाठी नवीन खेकडा पकडायला सिंधुदुर्गात येताय का? ; नितेश राणेंचा टोला

राणेंच्या बंगल्यात बेकायदा बांधकाम झाल्याची तक्रार

केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि शिवसेना यांच्यातील वाद सुरू असतानाच, मुंबई महापालिकेने नारायण राणे यांना नोटीस बजावली होती. राणे यांच्या जुहू येथील बंगल्याची पाहणी आणि बेकायदा बाधकामाची मोजणी करण्यासंदर्भात ही नोटीस बजावण्यात आली होती. जुहू येथील ‘अधिश’ बंगल्याची पाहणी आणि मोजणीसंदर्भात ही नोटीस होती. राणेंच्या बंगल्यात बेकायदा बांधकाम झाल्याची तक्रार माहिती अधिकार कार्यकर्ते संतोष दौंडकर यांनी महापालिका प्रशासनाकडे केली होती. मात्र, त्यावर कोणतीही कार्यवाही न झाल्याने दौंडकर यांनी पुन्हा महापालिका प्रशासनाला यासंदर्भात स्मरणपत्र पाठवले. त्यानंतर आता महापालिका प्रशासनाने ही कार्यवाही सुरू केली आहे.

Aaditya Thackeray:आदित्य ठाकरे यांचा आज राणेंच्या बालेकिल्ल्यात दौरा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here