लष्कर जलकेंद्राच्या अखत्यारीतील सोमवार पेठ, नरपतगीरी चौक ते १५ ऑगस्ट चौक दरम्यान पाणीपुरवठा करणाऱ्या वितरण वाहिनीचं तसंच लष्कर पाणीपुरवठा जनकेंद्र अंतर्गत रामटेकडी मुख्य जल नलिकेचे स्थापत्य विषयक तातडीचं देखभाल दुरुस्तीचं काम गुरुवारी केलं जाणार आहे. त्यामुळे गुरुवारी पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील तर शुक्रवारी कमी दाबाने पाणीपुरवठा होईल.
कोणत्या परिसरातील पाणीपुरवठा बंद राहणार?
१. लष्कर जलकेंद्र अंतर्गत जलमंदिर झोनमधील संपूर्ण परिसर जीई साउथ, जीई नॉर्थ, पुणे कॅन्टोनमेंटचा हद्दीचा सर्व भाग, सोमवार पेठ, मंगळवार पेठ, रास्ता पेठ, ताडीवाला रोड परिसर, कोरेगाव पार्कचा संपूर्ण भाग, पुणे स्टेशन परिसर, ससून हॉस्पिटल परिसर, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, आंबेडकर सांस्कृतिक भवन परिसर, गणेशखिंड रोड व परिसर, पाटील इस्टेट, शिवाजीनगर इत्यादी.
२. लष्कर जलकेंद्रअंतर्गत रामटेकडी झोनमधील संपूर्ण परिसर: संपूर्ण रामटेकडी इंडस्ट्रियल एरिया, सय्यदनगर हेवन पार्क, गोसावी वस्ती, शंकर मठ, वैदूवाडी, रामनगर, आनंदनगर, हडपसर गावठाण, सातववाडी, गोंधळेनगर ससाणेनगर, काळेपडळ, मुंडबा, माळवाडी, सोलापूर रोड डावीबाजू, केशवनगर, मांजरी बुद्रुक, शेवाळेवाडी, बी.टी. कुबडे रोडवरील काही परिसर, भीमनगर, बालाजीनगर, विकासनगर, ओरीयंट गार्डन साडेसतरानळी, महंमदवाडी रस्ता, उजवीकडील संपूर्ण भाग, संपूर्ण हांडेवाडी रोड, फुरसुंगी, उरुळी देवाची, भेकराईनगर, मंतरवाडी, ओताडेवाडी इ.