मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केसीआर यांच्या भेटीनंतर आता शिवसेनेने भाजपच्या हिंदुत्वावर हल्ला चढवायला सुरुवात केली आहे. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच समाजवादी पक्षाची निशाणी असलेली सायकल आणि दहशतवादाचा संबंध जोडण्याचा प्रयत्न केला होता. याच मुद्द्यावरून शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’तून पंतप्रधान मोदी यांच्यावर निशाणा साधण्यात आला आहे. अतिरेकी सायकलवर बॉम्ब ठेवून स्फोट घडवतात म्हणून अखिलेश यादव यांना मत देऊ नका, असे नरेंद्र मोदी यांनी म्हटले होते. पण असले पांचट विनोद करणे म्हणजे हिंदुत्व नव्हे, असा टोला शिवसेनेने पंतप्रधान मोदी यांना लगावला आहे.

बिगरभाजप सरकार असलेल्या राज्यांमध्ये केंद्र सरकारला अस्थितरता निर्माण करायची आहे. ज्या राज्यांनी भाजपला मतदान केले नाही त्यांचा सूड घेणे म्हणजे हिंदुत्व नव्हे. पण बदला घेणे, सूड घेणे म्हणजेच हिंदुत्व, रोज निवडणूक प्रचारात खोटे बोलणे म्हणजेच हिंदुत्व असा प्रकार या देशात सुरु झाला आहे. हिंदुत्वाचा असा चुकीचा भ्रम तयार करणाऱ्यांना २०२४ साली देशाच्या सत्तेवरून दूर करायला पाहिजे. दिल्लाचा रस्ता उत्तर प्रदेशातून जातो, असे म्हटले जाते. मात्र, २०२४ साठीचा दिल्लीचा रस्ता महाराष्ट्रातून जाईल, हे नक्की. ऐक्याची वज्रमूठ निर्माण झाली तर काहीच अशक्य नाही. तेलंगणाचे के. चंद्रशेखर राव यांच्या मुंबई भेटीचा हाच अर्थ आहे, असे ‘सामना’तील अग्रलेखात म्हटले आहे.

Shivsena vs BJP: गाडी फुल्ल होण्याआधीच भाजपमध्ये या, अन्यथा… ; निवडणुकीच्या तोंडावर दरेकरांची शिवसैनिकांना खुली ऑफर
‘चंद्रशेखर राव व महाराष्ट्रातील नेत्यांची पंगत बसली तर भाजपच्या पोटात का दुखतं?’

मोदी पाकिस्तानात जाऊन नवाज शरीफ यांना भेटतात मग चंद्रशेखर राव व महाराष्ट्रातील नेत्यांची पंगत बसली तर भाजपच्या पोटात का दुखतं, असा सवाल ‘सामना’तून उपस्थित करण्यात आला आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मुंबईत येऊन गेल्या. आता चंद्रशेखर राव आले. मधल्या काळात गुजरातचे मुख्यमंत्री पटेल हे मुंबईत आले पण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना न भेटता गेले. मुंबईत यायचे व उद्योगपतींना भेटायचे, आर्थिक उलाढाली करायच्या पण मुख्यमंत्र्यांना भेटायचे नाही. बिगरभाजप शासित राज्ये आणि भाजपशासित राज्ये यांच्यात आता दरी पडली आहे. जेथे भाजपचे मुख्यमंत्री नाहीत अशी राज्ये केंद्र सरकारच्या टार्गेटवर आहेत. या सरकारांना एकतर बदनाम करायचे, काम करू द्यायचे नाही, असे धोरण केंद्र सरकारने ठरवल्याची टीका ‘सामना’तून करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here