कीव, युक्रेन :

‘आम्ही कुणालाही घाबरत नाही’, असं वक्तव्य युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात केलंय. युक्रेनच्या सीमांवर दीड लाखांची फौज तैनात करून आंतरराष्ट्रीय समुदायापुढे डोकेदुखी निर्माण करणाऱ्या रशियानं आता वेगळ्या आघाडीवर ‘लढाई’ सुरू केलीय. युक्रेनच्या पूर्व भागातील रशियासमर्थक फुटीरतावाद्यांच्या ताब्यात असणाऱ्या प्रदेशाच्या स्वायत्ततेस मान्यता देण्याची घोषणा रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी केलीय. या खेळीनं पुतिन यांनी युक्रेनमध्ये सरळ-सरळ उभी फूट पाडलीय. यालाच झेलेन्स्की यांनी प्रत्यूत्तर दिलंय.

युक्रेनच्या पूर्वेकडील डॉनेत्स्क आणि लुहांस्क या दोन बंडखोर प्रांतांना स्वतंत्र देश म्हणून मान्यता देण्याचे आदेश रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन ( Vladimir Putin ) यांनी दिलेत. व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनमधील फुटीरतावादी प्रदेशांच्या स्वायत्ततेस मान्यता देतानाच आपलं सैन्य इथं तैनात करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, रशियाचे अध्यक्ष पुतिन यांच्या या ‘खेळी’वर जगातील अनेक देशांकडून जोरदार टीका करण्यात आलीय.

Vladimir Putin: पुतीन यांनी युक्रेनबाबत उचललं ‘हे’ स्फोटक पाऊल!; देशाला संबोधित करताच…
russia ukraine news : जग हादरणार! रशिया युक्रेनवर टाकणार ‘हा’ महाविद्ध्वंसक बॉम्ब, ब्रिटनचा दावा

जगाचं लक्ष युक्रेन घडामोडींकडे

युक्रेन संकटाबाबत चर्चेसाठी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेकडून एक तातडीची बैठक बोलावण्यात आलीय. युक्रेनवरील UNSC च्या बैठकीत संयुक्त राष्ट्रातील भारताचे स्थायी प्रतिनिधी टी एस तिरुमूर्ती यांनी या तणावावर चिंता व्यक्त केलीय. ‘रशियन फेडरेशनसह युक्रेनच्या सीमेवरील वाढता तणाव ही गंभीर चिंतेची बाब आहे. या घडामोडींमुळे प्रदेशातील शांतता आणि सुरक्षा कमकुवत होऊ शकते’ असं तिरुमूर्ती यांनी म्हटलंय.

बंडखोर प्रदेश अडचणीत येणार?

दुसरीकडे, अमेरिकेनं युक्रेनच्या मुद्द्यावर अतिशय कडक भूमिका घेतलीय. अमेरिका, युरोपियन युनियन, नाटो, ब्रिटनसह अनेक देशांनी रशियावर निर्बंध घालण्याची भूमिका जाहीर केलीय.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन लवकरच युक्रेनच्या DNR आणि LNR क्षेत्रांमध्ये नवीन गुंतवणूक, व्यापार आणि वित्तपुरवठा प्रतिबंधित करणारा एक कार्यकारी आदेश जारी करतील, असं ‘व्हाईट हाऊस’चे प्रेस सेक्रेटरी जेन साकी यांनी जाहीर केलंय.

biden putin meeting : युद्धाचे काळे ढग दाटले! पुतीन यांना भेटण्यास बायडन तयार, पण घातली ‘ही’ अट
False Flag Operation: युक्रेनमध्ये गाडीचा अचानक स्फोट; रशियाचं ‘फॉल्स फ्लॅग ऑपरेशन’ सुरू?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here