मुंबई: भीमा-कोरेगाव प्रकरणी येत्या काही दिवसांत बाजू मांडण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे आयोगासमोर हजर राहणार आहेत. शरद पवार यांनी तसे लेखी पत्राद्वारे कळवले आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली.

भीमा कोरेगाव प्रकरणात शरद पवार यांना आयोगाने बोलावले होते. परंतु चौकशी आयोगासमोर येता येत नाही. येत्या काही दिवसांतच बाजू मांडणार आहे, अशी माहिती पवार यांनी स्वतः लेखी पत्राद्वारे कळवले आहे. त्यामुळे ते नक्कीच आयोगासमोर हजर होतील, असेही नवाब मलिक यांनी सांगितले.

Disha Salian: दिशा सालियन प्रकरण पुन्हा उकरून काढल्याने नारायण राणे अडचणीत? महिला आयोग सक्रियमुंबईतील रस्ते खराब असतील तर नागरिक कोर्टात येतील, तुम्ही कशाला आलात; हायकोर्टाने भाजप नगरसेवकाला फटकारले

राज्यातील करोना लाट नियंत्रणात..

दोन वर्षानंतर राज्यात करोनाबाबत दिलासादायक परिस्थिती निर्माण झाली असून, नागरिकांच्या सहकार्याने करोनावर नियंत्रण मिळवण्यात यश आले असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली. राज्यात जवळपास ८०० रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. बहुतेक रुग्ण हे लक्षणे असलेले असले तरी, ते होम क्वारंटाइन आहेत. मुंबईत शंभराच्या खाली रुग्णसंख्या आहे. ही सर्व परिस्थिती बघता याबाबत पुढील काळात कोणते निर्देश द्यायचे, हे आरोग्य विभाग आणि मदत व पुनर्वसन विभाग प्रस्ताव तयार करतील आणि मुख्यमंत्री टास्क फोर्ससोबत चर्चा करून अंतिम निर्णय घेतील, असेही नवाब मलिक म्हणाले.

टीकेवर मर्यादा हवी; जयंत पाटील यांचा शिवसेना- काँग्रेसला समजुतीचा सल्लान्यायालयाचा अवमान केला नाही; बेहिबेशीच्या उत्तरात नवाब मलिक यांचा दावा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here