दिशाच्या मृत्यूनंतर माध्यमांच्या ससेमिरा मागे लागत असल्याने आम्ही घराबाहेर पडत नव्हतो. मात्र, आता पुन्हा या प्रकरणावरून राजकारणाला सुरुवात झाली आहे. या राजकारणामुळे आमच्या मृत मुलीच्या आत्म्याला शांती मिळत नाही. उगाच पुन्हा सगळं प्रकरण बाहेर काढण्यात आले आहे. त्यामुळे आम्हाला खूप त्रास होत आहे.

 

Disha Salian mother

दिशा सालियनच्या आईला पत्रकार परिषदेत अश्रू अनावर झाले होते.

हायलाइट्स:

  • तुमच्या या राजकारणामुळे आम्ही व्यथित झालो आहोत
  • या लोकांमुळे आम्हाला जगायची इच्छा उरलेली नाही
मुंबई: दिशा सालियनच्या मृत्यूनंतर सुरू असलेल्या राजकारणावरून तिच्या पालकांनी तीव्र नापसंती व्यक्त केली. दिशावर अत्याचार करून तिची हत्या केल्याचे आरोप खोटे आहेत. मात्र, आता मृत्यूनंतरही तिची बदनामी करत आहेत. तुमच्या या राजकारणामुळे आम्ही व्यथित झालो आहोत. या लोकांमुळे आम्हाला जगायची इच्छा उरलेली नाही. आम्हीही आता जीवाचं बरंवाईट करून घेऊ. त्यासाठी तुम्हीच जबाबदार असाल, असे दिशा सालियन हिच्या आईने सांगितले. दिशा सालियनच्या आई-वडिलांनी मंगळवारी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. महापौर किशोरी पेडणेकर या आज दिशाच्या पालकांच्या भेटीला गेल्या होत्या. त्यानंतर दिशा सालियनच्या पालकांनी माध्यमांसमोर आपली व्यथा मांडली.
Disha Salian: सचिन वाझे याच्या मर्सिडीजमधून दिशा सालियनला घरी नेण्यात आले? नितेश राणेंचा नवा बॉम्ब
दिशाच्या मृत्यूनंतर माध्यमांच्या ससेमिरा मागे लागत असल्याने आम्ही घराबाहेर पडत नव्हतो. मात्र, आता पुन्हा या प्रकरणावरून राजकारणाला सुरुवात झाली आहे. या राजकारणामुळे आमच्या मृत मुलीच्या आत्म्याला शांती मिळत नाही. उगाच पुन्हा सगळं प्रकरण बाहेर काढण्यात आले आहे. त्यामुळे आम्हाला खूप त्रास होत आहे. दिशाच्या मृत्यूनंतर आता आम्ही हा त्रास सहन करतोय. या सगळ्यामुळे आम्हाला जगायची इच्छा उरलेली नाही. आम्हीही आता जीवाचं बरंवाईट करून घेऊ. त्यासाठी राजकारण करणारे लोक जबाबदार असतील. कृपया आम्हाला आता जगू द्या, असे दिशाच्या आईने म्हटले. या सगळ्याविरोधात दिशाच्या पालकांनी महिला आयोगाकडे तक्रार केली आहे. आमची मुलगी गेलेय, पण तुम्हाला आमचं दु:ख समजत नाही का, असा सवाल दिशाच्या आईने केला. यावेळी दिशाच्या आईला अश्रू अनावर झाले होते. माझ्या मुलीची बदनामी करण्याचा हक्क यांना कोणी दिला? केवळ राजकारणासाठी ते करत असलेल्या आरोपांमुळे आमची अवस्था काय होतेय, याची कल्पना त्यांना नसावी. दिशाच्या दोन डिल रद्द झाल्या होत्या. त्यामुळे ती तणावात होती, असा खुलासाही तिच्या आईने केला.
दिशा सालियनवर बलात्कार होत असताना फ्लॅटबाहेर कोणत्या मंत्र्याचे सुरक्षारक्षक होते; नारायण राणे यांचा सवाल
दिशा सालियन प्रकरण पुन्हा उकरून काढल्याने नारायण राणे अडचणीत?

दिशा सालियन मृत्यूप्रकरणात नव्याने आरोपांची राळ उडवून देणारे भाजपचे केंद्रीय नेते नारायण राणे आता अडचणीत येण्याची शक्यता आहे. कारण नारायण राणे यांनी दिशा सालियनबाबत (Disha Salian) केलेल्या वक्तव्यांनंतर राज्य महिला आयोग सक्रिय झाला आहे. दिशा सालियनवर लैंगिक अत्याचार झालाच नव्हता. तरीही नारायण राणे (Narayan Rane) अशी वक्तव्ये करून मृत्यूनंतरही दिशा सालियनची बदनामी करत आहेत. महिला आयोगाने याची दखल घ्यावी, अशी मागणी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केली होती. त्यानंतर महिला आयोगाने झटपट हालचाली करत मालवणी पोलिसांना अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर आता दिशाच्या पालकांनीही आपला छळ सुरु असल्याचे पत्र महिला आयोगाला पाठवले आहे. त्यामुळे आता महिला आयोग या प्रकरणात काही कारवाई करणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : disha salian parents urges bjp leaders please let us live or we suicide after meeting shivsena kishori pednekar
Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here