मुंबई: पॉर्नोग्राफी प्रकरणात मुंबई पोलिसांच्या क्राइम ब्रांचने वर्सोवा आणि बोरिवली परिसरात मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी वर्सोवा आणि बोरिवलीतून चार जणांना अटक केली आहे. त्यात कास्टिंग डायरेक्टरचाही समावेश आहे.

या प्रकरणात पोलिसांनी चार फरार आरोपींना अटक केली आहे. त्यात नरेश रामअवतार पाल (वय २९), सलीम सय्यद (वय ३२), अब्दुल सयद (वय २४) आणि अमन बर्नवाल (वय २२) अशी अटक केलेल्या चौघांची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, चित्रपट जगतात सर्वात चर्चेत असलेल्या या प्रकरणात मुंबई क्राइम ब्रांचच्या कारवाईला मोठे यश मिळालं आहे. पॉर्नोग्राफी प्रकरणात फरार चार जणांना अटक केली आहे. या चौघा आरोपींवर मॉडेल आणि अभिनेत्रींचे जबरदस्तीने पॉर्न फिल्म शूट केल्याचा आरोप आहे. यातील एका प्रकरणात उद्योगपती राज कुंद्रा आणि एका अभिनेत्रीला क्राइम ब्रांचने अटकही केली होती. राज कुंद्रा यांना बरेच दिवस तुरुंगात राहावे लागले होते. जवळपास दोन महिने तुरुंगात राहिल्यानंतर कुंद्रा यांना मुंबईतील कोर्टाने जामिनावर मुक्त केले होते.

Mask Free Maharashtra : मास्कमुक्ती कधी मिळणार? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले…
आजपासून सिग्नल तोडल्यास दंड
कास्टिंग डायरेक्टरही अटकेत

मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणात मुंबई पोलिसांनी ज्या चार जणांना अटक केली आहे, त्यात कास्टिंग डायरेक्टर आणि अन्य तिघांचा समावेश आहे. पोलिसांनी या चौघांना वर्सोवा आणि बोरिवली परिसरातून अटक केली आहे. वृत्तानुसार, मॉडेल्स आणि अभिनेत्रींना मुंबईच्या मढ परिसरात घेऊन जात होते. तसेच तिथे पॉर्न फिल्म शूट केले जात होते. त्या बदल्यात या मॉडेल्स आणि अभिनेत्रींना प्रत्येकी दोन हजार रुपये दिले जात होते, अशी माहिती समोर आली आहे. या प्रकरणात कास्टिंग डायरेक्टरला अन्य तीन आरोपी मदत करत होते, अशी माहितीही उजेडात आली आहे.

फटाक्यांच्या कारखान्यात झालेल्या भीषण स्फोटात ७ महिलांचा होरपळून मृत्यू, १० जखमी

तिघे आरोपी बुटके

या प्रकरणात १६ फेब्रुवारीलाच आरोपींना अटक करण्यात आली होती. त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. गहना वशिष्ठ हिने चित्रीत केलेल्या अश्लील चित्रपटात काम केल्याचा आणि या चित्रपटातील अभिनेत्रीवर बलात्कार केल्याचा यांच्यावर आरोप आहे. यातील नरेश पाल सोडला, तर इतर तिघे आरोपी बुटके आहेत. त्यांची उंची तीन ते साडेतीन फूट आहे. काहीतरी वेगळं करण्याच्या प्रयत्नात यांना भूमिका देण्यात आली होती. या आरोपींना प्रत्येकी २ ते ३ हजार रूपये मिळाल्याची प्राथमिक माहिती आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here