औरंगाबाद : अपघातग्रस्तांना मदत करण्याचे अनेकदा आवाहन केले जाते. तसेच अनेकजण मदत करतात सुद्धा, पण औरंगाबादमध्ये अपघातग्रस्तांना मदत करणं एका संगणक ऑपरेटरला चांगलेच महागात पडले आहे. मदत करणाऱ्या व्यक्तीलाचा जखमींच्या नातेवाईकांनी लाथाबुक्क्यांसह विटकरीने जबर मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. तर या मारहाणीत कृष्णा रामभाऊ राठोड (३० रा. चिमणपीरवाडी, जटवाडा) जखमी झाले आहेत.

त्याच झालं असे की,कृष्णा राठोड हे काठशिवरी येथे राहणाऱ्या आपल्या बहिणीला भेटण्यासाठी गेले होते. तर रविवारी दुपारी चारच्या सुमारास भागवत व रामभाऊ राठोड यांच्या जीपने (एमएच२४ एएस१३४०) ते औरंगाबादकडे परतत होते. याचवेळी त्यांना रस्त्यात त्यांना अपघात झालेला दिसला. या अपघातात सचिन वाघ आणि श्रीराम घोडके हे दोघे दुचाकीवरून पडून जखमी झाले होते. तर तेथे उपस्थित गावकऱ्यांनी जखमी झालेल्या दोघांना रुग्णालयात घेऊन जाण्याची राठोड भावंडांना विनंती केली.

खासदाराच्या ‘ट्विट’ने उडाली खळबळ, ५ टक्के कमिशन मागितल्याचा आरोप

त्यामुळे त्यांनी जखमींना एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यासाठी आणले. तसेच जखमींवर उपचार करण्यासाठी राठोड भावंडे रुग्णालयात थांबली. याचदरम्यान अपघातात जखमी झालेल्या वाघ यांचे नातेवाईक रुग्णालयात आले. तसेच काहीही विचारपूस न करता थेट राठोड यांना शिवीगाळ व धक्काबुक्कीला सुरुवात केली. तर विशाल वाघ व त्याच्यासोबत आलेल्या तिघांनी विटकरी डोक्यात मारल्या. ज्यात कृष्णा जबर जखमी झाले. त्यामुळे कृष्णा यांनी दिलेल्या तक्रारीवरून सिडको पोलिसांनी गुन्हा नोंदवला.

सलग दोन वर्ष नुकसान तरीही धीर सोडला नाही; दुष्काळी पट्ट्यात टरबुजाचे यशस्वी उत्पादन

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here