बीड : आज कालच्या तरूणाईला स्टंटबाजीचं भुरळ लागलं आहे आणि हीच स्टंटबाजी कधीकधी या तरुणाईच्या अंगलट येते. असाच काहीसा प्रकार बीडमध्ये देखील समोर आला आहे. बीडच्या एका २२ वर्षीय तरुणाने छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त काढलेल्या दुचाकी रॅलीत, भररस्त्यात तलवार हातात घेऊन स्टंटबाजी केली. याच स्टंटबाजीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हायरल फोटोवरून शहरात हिरोगिरी करणाऱ्या या तरुणाला बीड पोलिसांनी आता तुरुंगवारी दाखवली आहे.

गणेश उर्फ टिनू गोरख शिराळे वय २२, जिजाऊ नगर, बीड असं त्या आरोपीचे नाव आहे. १९ फेब्रुवारी शिवजयंतीनिमित्त काढलेल्या रॅलीत गणेश शिराळे याने दुचाकीवर उभे राहून हातात तलवार घेऊन स्टंटबाजी करत हिरोगिरी केली. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. तलवारजवळ बाळगून तो दहशत निर्माण करत असल्याची माहिती मिळताच एलसीबीचे पोलीस उपनिरीक्षक भगतसिंग दुल्लत यांच्यासह कर्मचाऱ्यांनी तलवार घेऊन हिरोगिरी करणाऱ्या गणेश शिराळेला अटक करत तुरुंगवारी दाखवली.

चोरट्यांची हुशारी, एटीएम मशीन फोडण्यासाठी ‘असं’ काही केलं की पोलिसही हादरले

दरम्यान, याप्रकरणी बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये ३/२५ नुसार गुन्हा दाखल झाला असून आरोपी शिराळेची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

अपघातग्रस्तांना मदत करणं पडलं महागात; जखमींच्या नातेवाईकांनी डोक्यात घातली वीट

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here