हिंगोली : जे सोयाबीन उत्पादक शेतकरी असतील अशा शेतकऱ्यांसाठी सध्या आनंदाची बातमी आहे. सोयाबीनच्या बाजार भावात वाढ होत आहे. त्यामुळे बळीराजाच्या एक माला पुन्हा एकदा अच्छे दिन येण्याची संकेत दिसू लागले आहेत. राज्यात खरीप हंगामातील महत्त्वाचे पीक म्हणजे सोयाबीन आणि कापूस आहे. यावर्षी अवेळी झालेल्या त्यामुळे सोयाबीन आणि कापूस या पिकांचे उत्पादन घटले आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन घटल्याने त्यांना होणारा फायदा हा कमी झाला. त्यातच कमी भाव मिळाल्याने मोठे नुकसान झाले होते. अशा वेळेस जर शेतकरी बांधवांच्या शेतमालाला चांगला भाव मिळाल्यास त्यांचे होणारे नुकसान हे भरून निघू शकते. सर्व सोयाबीन तसेच कापूस उत्पादक शेतकरी भाव कधी वाढणार याची वाट पाहत होते.

सुरुवातीला म्हणजे ज्या वेळेस शेतकऱ्यांची सोयाबीन हे शेतामधून निघाले त्यावेळी सोयाबीन या पिकास बाजार भाव कमी होता त्यानंतर बाजार भाव स्थिर होते. काही कालांतराने स्वायबीन भाव हे शेतकऱ्यांनी दाखविलेल्या एकीमुळे वाढले होते. परंतु बाजारात आवक वाढली आणि सोयाबीन या खरीप पिकांचे बाजार भाव आहे पुन्हा कमी झाले होते तेव्हापासून सोयाबीनचे दर स्थिर होते. यामुळे सोयाबीन कधी वाढणार याची वाट सोयाबीन उत्पादक शेतकरी पाहत होते. भाव घसरल्यामुळे बाजारातील आवक सुद्धा मंदावली होती.

शिवजयंतीला हातात तलावर घेऊन तरुणाची स्टंटबाजी, व्हायरल फोटोमुळे आला गोत्यात
परंतु, या आठवड्यात पुन्हा एकदा सोयाबीन या पिकांच्या बाजार भावात तेजी देताना दिसून येतंय सोयाबीनचे बाजार भाव आहे वाढत आहेत. जसे सोयाबीनचे वाढत आहेत, तसतशी बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची आवक सुद्धा वाढत आहे. त्यामुळे बरेच शेतकरी सोयाबीनचे भाव वाढत असल्यामुळे त्यांचे सोयाबीन मार्केटमध्ये विकण्यास काढत आहेत. बळीराजाला शेवटी शेवटी सोयाबीन पिकास चांगला भाव मिळेल असे दिसून येत आहे.

मागिल आठवड्यामध्ये हिंगोली जिल्ह्यात सोयाबीनचे बाजार भाव पाच हजार रुपयांपासून साडेसहा हजार रुपयापर्यंत होते. परंतु आता हेच भाव ६००० ते ७००० हजार या पर्यंत पोहोचल्याची माहिती व्यापारी व बाजार समिती हिंगोली यांनी दिली आहे. चांगल्या प्रतीच्या मालाला भाव मिळत असल्याने आवक सुद्धा वाढलीय. आणखी यामध्ये ३०० ते ४०० रुपयांनी होण्याचा अंदाज बाजार समितीने व्यक्त केला आहे.

चोरट्यांची हुशारी, एटीएम मशीन फोडण्यासाठी ‘असं’ काही केलं की पोलिसही हादरले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here