करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अमित शहा यांनी राज्यांमध्ये क्वारंटाइन केंद्र स्थापन करण्यासाठी आणि इतर आवश्यक बाबींसाठी राज्यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यांसाठी हा ११ ,०९२ कोटींचा निधी मंजूर केला आहे. वर्ष २०२०-२१ नुसार स्टेट डिजास्टर रिस्क मॅनेजमेंट फंडनुसार (SDRMF) राज्यांना पहिल्या टप्प्यातील हा निधी मंजूर झाला आहे. यामुळे राज्यांना करोना व्हायरसचा सामना करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येणार आहेत.
करोनाच्या पार्श्वभूमवीर देशाच्या सर्व सीमा बंद करण्यात आल्या आहेत. तसंच निझामुद्दीनमधील तबलीघी जमातच्या मरकझमधील कार्यक्रमा सहभागी झालेल्या आणि भारतातून गेलेल्या ३६० विदेशी नागरिकांना काळ्या यादीत टाकण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. व्हिसाच्या नियमांचे उल्लंघन आणि आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गंत ३६० विदेशी नागरिकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्व पोलीस महासंचालक आणि पोलीस आयुक्तांना या प्रकरणी कठोर कारवाई करण्याचे आदेश केंद्रीय गृहमंत्रालयाने दिले आहेत. दरम्यान जे ९६० विदोशी नागरिक भारतात आहेत त्यांच्या प्रत्यार्पणचा प्रश्न नाहीए. प्रत्युर्पण झालेच तर ते आरोग्यासंबंधीच्या दिशानिर्देशांनुसारच होईल, असं केंद्रीय गृहमंत्रालयाच्या संयुक्त सचिव पुण्य सलिला श्रीवास्तव यांनी सांगितलं.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times