मुंबई: गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासह कुटुंबीयांवर भ्रष्टाचाराचे आरोप करणारे भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी पुन्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. उद्धव ठाकरे यांचे थोतांड उघडकीस आणल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आता सोमय्या कुटुंबीयांच्या अटकेचे आदेश मुंबईच्या पोलीस आयुक्तांना दिले आहेत, असे सोमय्या म्हणाले.

भाजप नेते किरीट सोमय्या यांच्याकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह कुटुंबीय आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांना लक्ष्य करण्यात येत आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांच्यासह कुटुंबीयांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले जात आहेत. अलिबागमधील जमिनीबाबतही काही कागदपत्रे माध्यमांसमोर दाखवून सोमय्या यांनी ठाकरे कुटुंबीयांवर आरोप केले होते. सोमय्या यांच्या आरोपांना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सडेतोड उत्तरे दिली होती. तर सोमय्या यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांवरही गंभीर आरोप केले होते. तसेच सोमय्या लवकरच तुरुंगात जातील असा दावा राऊत यांनी केला होता. आता सोमय्या यांनी पुन्हा उद्धव ठाकरे यांना लक्ष्य करतानाच, गंभीर आरोप केला आहे.

महाराष्ट्राला घोटाळेमुक्त करण्यासाठी मी पत्नी मुलासह जेलमध्ये जाण्यास तयार – सोमय्या

गेल्या आठ दिवसांत संजय राऊत यांनी माझ्याविरोधात चार वेगवेगळे आरोप केले, परंतु त्यांनी एकाही आरोपासंबंधीची कागदपत्रे दाखविली नाहीत. याउलट मी अनेक पुरावे सादर केले, असं सोमय्या यांनी सांगितले. ज्यावेळी मी उद्धव ठाकरे यांचे थोतांड उघडकीस आणले, त्यानंतर कालच मुख्यमंत्र्यांनी मुंबई पोलीस आयुक्तांनाआदेश दिले की किरीट सोमय्या, मेधा सोमय्या आणि नील सोमय्या यांना अटक करा, असा गंभीर आरोप सोमय्या यांनी केला. आम्ही सगळे महाराष्ट्राला घोटाळामुक्त करण्यासाठी जेलमध्ये जायला तयार आहोत, असा निर्धारही सोमय्या यांनी यावेळी व्यक्त केला.

‘ठाकरे दाम्पत्यामुळं महाविकास आघाडीत एकी’टीकेवर मर्यादा हवी; जयंत पाटील यांचा शिवसेना- काँग्रेसला समजुतीचा सल्ला

काही दिवसांपूर्वी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन निकॉन इन्फ्रामध्ये किरीट सोमय्या यांच्या कुटुंबीयांची आणि पीएमसी बँक घोटाळा प्रकरणातील वाधवान यांची भागीदारी असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर आता किरीट सोमय्या यांनी गंभीर आरोप केला असून, लवकरच ठाकरे सरकारकडून मला अटक करण्यात येणार असल्याची माहिती देऊन खळबळ उडवून दिली आहे. किरीट सोमय्या यांचा मंत्रालयातील व्हायरल झालेल्या फोटोबाबत आणि त्यांच्या सुरक्षेबाबत छेडछाड झाल्याचा आरोप करत महाराष्ट्र आणि केंद्र सरकारच्या गृहविभागाकडे तक्रार केली होती. त्यासंबंधीचा केंद्रीय गृहविभागाच्या सुरक्षा विभागाकडून अहवाल प्राप्त झाल्याचे किरीट सोमय्या यांनी सांगितले. सुरक्षासंदर्भातील अहवालात हा फोटो प्रताप सरनाईक यांनी काढला असल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे आता प्रताप सरनाईक यांना अटक कधी करणार, असा सवाल किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्र्यांना केला.

Kirit Somaiya: किरीट सोमय्यांचा शिवसेनेवर पुन्हा हल्लाबोल, रश्मी ठाकरे आणि संजय राऊत यांची ‘ती’ पत्रं समोर ठेवली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here