डोडोमा, टांझानिया :

आपल्या ओठांवर बॉलिवूडची हिंदी गाणी खेळवत प्रसिद्धीच्या झोतात आलेला टांझानियाचा सोशल मीडिया स्टार किली पॉल हा आता जगभरात ओळखीचा चेहरा झालाय. टांझानिया स्थित भारतीय उच्चायोगानं किली पॉल याला बोलावून घेत सन्मानही केलाय.

Russia Ukraine crisis: वाट पाहू नका, त्वरीत युक्रेन सोडा; भारतीय दूतावासाची तिसरी अॅडव्हायजरी जारी
Ukraine Female Troops: युक्रेनमध्ये महिलाही लढाईसाठी सज्ज… हाती घेतलं हत्यार!
किली पॉलचा गौरव

टांझानियातील भारतीय उच्चायुक्त बिनाया प्रधान यांनी सोमवारी ट्विटरवर किली पॉल याच्यासोबत आपला एक फोटो शेअर केला. या फोटोत बिनाया भारतीय दूतावास कार्यालयात पॉलचा सत्कार करताना दिसत आहे.

‘आज टांझानियातील भारतीय उच्चायुक्तालयात खास पाहुणा दाखल झाला… किली पॉल यानं भारतीय चित्रपटांमधील प्रसिद्ध गाण्यांवरील व्हिडिओंनी लाखो भारतीयांची मनं जिंकली आहेत’ असं बिनाया यांनी सोशल मीडियावर म्हटलंय.


कोण आहे किली पॉल?

सोशल मीडियावर भारतीय गाण्यांची ‘लिप सिकिंग’ मोठ्या खुबीनं करताना दिसणारा किली पॉल हा आता जगभरात पोहचलाय. सोशल मीडियावर त्याच्या फॉलोअर्सची संख्या काही लाखांमध्ये आहे. इतकंच नाही तर अनेक बॉलिवूड स्टारदेखील किली पॉल याला फॉलो करतात.

‘भारतीय उच्चायुक्तांचे खूप खूप आभार’ असं म्हणत किलीनंही सोशल मीडियावरून भारतीय उच्चायुक्तांचे आभार मानलेत.


गेल्या वर्षी प्रेक्षकांसमोर दाखल झालेल्या ‘शेरशाह’ चित्रपटातील ‘रातां लंबिया’ गाण्याचे बोल गुणगुणताना पॉलचा एक व्हिडिओ चांगलाच चर्चेत आला होता. या व्हिडिओमध्ये तो त्याची बहीण नीना पॉलसोबत दिसत आहे. त्यानंतर भारतातही किली भलताच चर्चेत आला.


सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर किलीचे जवळपास २२ लाख फॉलोअर्स आहेत. अभिनेता आयुष्मान खुराना, गुल पनाग आणि रिचा चढ्ढा यांच्यासह अनेक कलाकार किलीला सोशल मीडियावर फॉलो करताना दिसतात.

India China: परराष्ट्रमंत्री जयशंकर यांच्या वक्तव्याची चीनला मिरची झोंबली!
Notorious Markets in India: भारतातले पाच ‘कुप्रसिद्ध बाजार’… अमेरिकेनं यादी केली जाहीर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here