लखनऊ: गेल्या लोकसभा निवडणुकीवेळी पिवळ्या साडीतील एक महिला निवडणूक अधिकारी चर्चेत आली होती. आता विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा ही महिला अधिकारी चर्चेत आली असून यावेळी त्यांचा नवा लूक सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. रीना द्विवेदी असं त्यांचं नाव असून लखनऊ येथील रहिवासी असलेल्या रीना यांना शहरातीलच मोहनलालगंज विधानसभा मतदारसंघात ड्युटी देण्यात आली आहे. ( Reena Dwivedi New Look )

वाचा : उत्तर प्रदेशात भाजप मायावतींची मदत घेणार?; अमित शहा म्हणाले…

रीना द्विवेदी या २०१९च्या लोकसभा निवडणुकीवेळी चर्चेत आल्या होत्या. पिवळी साडी नेसून निवडणूक ड्युटीवर पोहचलेल्या रीना यांचे खास फोटो तेव्हा व्हायरल झाले होते. सोशल मीडियात त्यांच्या फोटोंवर लाइक्सचा वर्षाव झाला होता. तसंच काहीसं आता विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानेही घडताना दिसत आहे. उत्तर प्रदेशात चौथ्या टप्प्यातील मतदान आज होत असून त्याआधीच रीना द्विवेदी या पुन्हा चर्चेत आल्या आहेत.

वाचा : राष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून नाव चर्चेत येताच नितीशकुमार म्हणाले…

रीना यांनी आता आपला गेटअप पूर्णपणे बदला असून त्यांच्या वेस्टर्न लूकमुळे सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे. रीना यांना आता लखनऊमधील मोहनलालगंज मतदारसंघात ड्युटी देण्यात आली आहे. मंगळवारी ईव्हीएम मशीन घेऊन त्या ड्युटीसाठी रवाना झाल्या. यावेळी ब्लॅक स्लीवलेस टॉप आणि ऑफ व्हाइट ट्राउजर अशा लूकमधील रीना यांचे फोटो टिपण्यासाठी अनेक कॅमेरे सरसावले. अनेक कर्मचारी त्यांच्यासोबत सेल्फीही काढत होते. रीना यांचे हे फोटो सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहेत.

reena dwivedi

रीना द्विवेदी

उत्तर प्रदेशात आज चौथ्या टप्प्याचे मतदान

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्याचे मतदान आज पार पडणार आहे. या टप्प्यात नऊ जिल्ह्यांतील ५९ विधानसभा मतदारसंघांत निवडणूक होणार आहे. या टप्प्यातील जाहीर प्रचार सोमवारी संपला. शेवटच्या क्षणी प्रचारादरम्यान राजकीय पक्षांमधील आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. चौथ्या टप्प्यात पिलिभित, लखिमपूर खिरी , सीतापूर, हरदोई, उन्नाव, लखनऊ, रायबरेली, बांदा आणि फतेहपूर या जिल्ह्यांतील ५९ विधानसभा मतदारसंघांतील ६२४ उमेदवारांचे भवितव्य ठरणार आहे. २०१७मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत येथील ५९ जागांपैकी ५१ जागांवर भाजपने वर्चस्व मिळवले होते, तर समाजवादी पक्षाला चार आणि बहुजन समाज पक्षाला तीन जागा जिंकता आल्या. अपना दल-सोनेलालने एक जागा मिळवली होती. या टप्प्यात उत्तर प्रदेशचे कायदामंत्री ब्रिजेश पाठक, दोन वेळा नगरसेवक राहिलेले सुरेंद्र सिंह गांधी, मंत्री आशुतोष टंडन, विधानसभेचे माजी उपाध्यक्ष नितीन अग्रवाल हे प्रमुख उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

वाचा : यूपी निवडणुकीनंतर नितीशकुमार फोडणार ‘बॉम्ब’!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here