शाहूपुरी पोलिसांनी या गुन्ह्याची माहिती दिली. मध्यवर्ती बस स्थानक परिसरातील एका हॉटेलसह शहरात वेगवेगळ्या ठिकाणी जानेवारी २०२१ ते १६ फेबुवारी २०२२ या कालावधीत युवतीवर अत्याचार करण्यात आला आहे. पीडित युवती व संशयित कांबळे यांची ओळख झाल्यावर जानेवारी २०२१ मध्ये संशयित तरुणाने वेळोवेळी पीडित युवतीला फोन करून ‘तू मला आवडतेस, मी तुला भेटण्यासाठी कोल्हापूर येणार आहे, असं म्हणून तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न करत होता. नांदेडहून संशयित कांबळे तिला भेटण्यासाठी कोल्हापुरात आला. त्याने पीडितेला मध्यवर्ती बस स्थानक परिसरात एका हॉटेलमध्ये नेले. संशयिताने पीडितेच्या इच्छेविरुद्ध तिच्याशी शारीरिक संबध ठेवले. तिचे मोबाईलवर अर्धनग्न फोटो काढून तिला मारहाण केली. तिच्या गळ्यातील अर्धा तोळ्याची सोन्याची चैन काढून घेऊन, तिला रात्रभर हॉटेलमध्ये थांबवून ठेवले.
या घटनेनंतर धक्का बसलेल्या पीडितेने संशयितांशी बोलणे टाळले. बोलणे टाळल्याचे लक्षात आल्यावर संशयिताने युवतीच्या अंगावर अॅसिड फेकण्याची धमकी दिली. याबाबत पीडित युवतीने शाहूपुरी पोलीस ठाण्यात संशयित सोमेश कांबळे याच्याविरोधात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी कांबळे याच्यावर बलात्कार करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक श्वेता पाटील करत आहेत.