अहमदनगर : संगमनेर तालुक्यातील मेंढवण शिवारात ४५ वर्षीय हिराबाई एकनाथ बढे या महिलेचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. सोमवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. घराजवळ दबा धरून बसलेल्या बिबट्याने हिराबाई बढे यांच्यावर हल्ला करत त्यांना जखमी केले आणि त्यांच्या गळ्याचा चावा घेतला. जखमी अवस्थेत हिराबाई यांना लोणी येथील प्रवरा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र तेथे त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. (Leaopard Attack)

सह्याद्रीच्या पर्वत रांगा आणि मोठ्या प्रमाणात वनक्षेत्र असलेल्या संगमनेर तालुक्याला बिबट्यांचा संचार नवा नाही. प्रवरा पट्ट्यातील उसाच्या मोठ्या क्षेत्रात बिबट्यांचा मुक्काम अनेकदा असतो. त्यांच्याकडून पाळीव प्राण्यांवर हल्ले होण्याच्या घटना वारंवार घडत असतात. मात्र आता भक्ष्याच्या शोधात असलेल्या बिबट्याने चक्क महिलेवरच हल्ला करत तिला ठार केल्याने अहमदनगर जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.

संजय दत्त यांच्यासह तिघांवर मारहाणप्रकरणी गुन्हा दाखल; दत्त यांनी आरोप फेटाळले

मेंढवण गावच्या बढे वस्तीवर हिराबाई बढे या आपल्या कुटुंबियांसोबत राहात होत्या. सोमवारी सायंकाळी साडेसात ते आठ वाजेच्या दरम्यान हिराबाई आपल्या घराच्या बाहेरील बाजूस आवराआवर करत असताना जवळच्या झुडपात दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर अचानक हल्ला केला. बिबट्याने थेट महिलेच्या गळ्यालाच जबड्यात पकडल्याने त्यांना प्रतिकार करण्याची संधीच मिळाली नाही. बिबट्याचे दात त्या महिलेच्या गळ्यात खोलवर घुसल्याने त्यातून त्यांना गंभीर दुखापत झाली. त्यात बिबट्याच्या नखांनीही शरीरावर अन्यत्र जखमा झाल्याने त्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला.

या हल्ल्यानंतर कुटुंबातील सदस्यांनी मोठ्याने आरडाओरडा केल्यानंतर नरभक्षक बनलेल्या बिबट्याने महिलेला काही अंतरावर ओढून नेत सोडून दिलं. कुटुंबियांनी हिराबाई यांना रुग्णालयात हलवलं, मात्र त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या धक्कादायक घटनेने परिसरात दहशतीचं वातावरण तयार झालं असून नरभक्षक बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here