यानंतरही ग्राहकाचा दावा बँकेने फेटाळून लावला. ग्राहकानेच त्याचा ओटीपी अथवा पीन क्रमांक शेअर केल्याचा दावा बँकेने केला. तसेच यूपीआय सिस्टीमधून रकमेचा व्यवहार झाल्याचे म्हणणे बँकेने आयोगा समोर सादर केले. मात्र रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियमानुसार, ग्राहकाच्या तक्रारीचे निराकरण करणे बँकांना बंधनकारक असते. पण बँकेने नियमांचे पालन केले नाही आणि कुठलीही कार्यवाही केली नसल्याचे निरीक्षण आयोगाने नोंदविले. सुनावणीअंती आयोगाने बँकेला दणका देत, ग्राहकाला ही रक्कम ६ टक्के व्याजासह ३० दिवसांत परत करावी, तसेच मानसिक त्रासापोटी पाच हजार आणि खर्चापोटी एक हजार रुपये देण्याचे आदेश दिले आहे.
Home Maharashtra Aurangabad News Circulating Money From Customer Account Bank Hit By Consumer Commission...
Aurangabad News Circulating Money From Customer Account Bank Hit By Consumer Commission | ग्राहकाच्या खात्यातून रक्कम परस्पर वळवणे भोवले; बँकेला ग्राहक आयोगाचा दणका
औरंगाबाद : ग्राहकाच्या खात्यातील रक्कम परस्पर वळवणे आणि या प्रकरणात जबाबदारी झटकणाऱ्या एचडीएफसी बँकेला जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने दणका दिला. बँकेने ग्राहकाला ही रक्कम ६ टक्के व्याजासह ३० दिवसांत परत करावी, तसेच मानसिक त्रासापोटी पाच हजार आणि खर्चापोटी एक हजार रुपये देण्याचे आदेश दिले आहे.