औरंगाबाद : अतिवृष्टी आणि आवकाळीचा सामना करून कसे तरी मोसंबीची बाग जगवणारे शेतकरी पिकाला अल्पदर मिळत असल्याने आधीच संकटात सापडले आहे. त्यातच आता चोरट्यांनी मोसंबीच्या उभ्या बागेत डाव मारत मोसंबी लांबवल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे. औरंगाबादच्या बालानगर येथील शेतकऱ्यांच्या शेतातून एका रात्रीत तब्बल दीड ते दोन टन मोसंबी अज्ञात चोरट्यांनी लांबवल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पैठण एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पैठण तालुक्यातील बालानगर, येथील शेतकरी अफसर अकबर पठाण यांचे बालानगर शिवारातील गट नं. १७४ मध्ये जमीन आहे. तेथे त्यांनी मोसंबीची लागवड केली असून, सध्या मोसंबीच्या झाडाला मोठ्या प्रमाणात मोसंबी लगडली आहे. मात्र, रविवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी चक्क उभ्या झाडांची मोसंबी तोडून सुमारे दीड ते दोन टन मोसंबीवर डल्ला मारला. यामध्ये शेतकऱ्यांचे सुमारे ५० हजार रुपये किंमतीचा माल चोरी गेला आहे.

मका पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भावामुळं उत्पादनात घट; असा करा अळीचा बंदोबस्त
दुसऱ्या दिवशी अफसर पठाण शेतात चक्कर मारण्यासाठी गेले असता, झाडावरील मोसंबी तोडून नेल्याच त्यांच्या लक्षात आले. विशेष म्हणजे मागील काही दिवसांपुर्वी कृषीपंपाची चोरी झाली होती. त्यात पुन्हा ही घटना घडल्याने परीसरातील शेतकऱ्यांत एकच खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण पसरले आहे. याप्रकरणी पोलिसांत अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घरातून येत होती दुर्गंधी, ४५ दिवसांनी अंगणात खोदून बघितल्यावर मुलीला बसला धक्का

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here