औरंगाबाद न्यूज लाइव्ह: निसर्गाच्या अवकृपेमुळे शेतकरी पुन्हा अडचणीत, ४ कोटीचे झाले नुकसान – osmanabad newspaper humiliation of nature the farmers are in trouble again the loss is 4 crores
उस्मानाबाद : निसर्गाच्या अवकृपेमुळे शेतकरी पुन्हा अडचणीत आला आहे. जागजी येथील द्राक्ष बागायतदार अडचणीत आले असून ४ कोटीचे झालं आहे. नुकसान भुरी, करपा, डाऊनी, मुळकुज, मिलिबग. गळ, घडकुज, अतिपावसाने मुळी बंद पडणे, यामुळे जागजी येथील द्राक्ष बागावर कुराड फिरवली जात आहे. आतापर्यंत ३५ एकर वरिल द्राक्ष बाग नष्ट झाली आहे.
उस्मानाबाद तालुक्यातील जागजी येथील शेतकऱ्यांनी दिडशे एकरवर द्राक्ष लागवड केली आहे. परंतु, निसर्गाने अवकृपेमुळे येथील शेतकरी अडचणीत सापडला आहे. १५० एकर पैकी ९० एकर द्राक्ष बाग अतिपावसामुळे व धुईमुळे विविध आजाराला बळी पडल्यामुळे द्राक्ष लागलीच नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांनी केलेला खर्च वाया गेला दोन वर्षे करोनामुळे या शेतकऱ्यांचा माल विकलाच नाही तर या वर्षी निसर्गाच्या अवकृपेमुळे नुकसान झालं आहे. पिसाळलेल्या कुत्र्याची गावात दहशत; एकाचवेळी लहान मुलांसह ६ जणांना चावा दुसरीकडे व्यापारी हे माल खराब झालाय हे कारण सांगत द्राक्षे कमी दराने मागत आहेत. जी द्राक्षे ११० रुपये किलो या दराने जायला पाहिजे होती तीच द्राक्षे २०/२५ रुपये दराने व्यापारी मागत असल्यामुळे केलेला खर्च सुध्दा मिळणे मुश्किल आहे.