दरम्यान, आज पांढरी परिसरातील राकेश अग्रवाल यांच्या शेतातील खोलीत दोघांचाही एकमेकांना अलींगण घातलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला असून दोघांच्याही हातात चायना चाकू असल्याचे आढळून आले. त्यामुळे या दोघांनी प्रेम प्रकरणातून ही आत्महत्या केली असावी असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. ४८ वर्षीय महिला अलका दोडके ही घरी न आल्यामुळे त्यांचा शोध घेण्यात येत होता त्यांनी मोबाईल वर सुद्धा प्रतिसाद न दिल्याने पोलिसांनी शोधाशोध केली दरम्यान हा धक्कादायक प्रकार आज उघडकीस आला.
या प्रकरणातील दोघेही प्रेमीयुगल हे विवाहित आहेत आणि पांढरी सेट शिवारातील रक्ताने माखलेल्या अवस्थेत हा मृतदेह आढळून आल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. यासंदर्भात अधिक माहिती देताना परतवाडाचे ठाणेदार संतोष ताले म्हणाले की घटनास्थळी वरिष्ठ पोलीस पंचनामा करत असून फॉरेन्सिक टीमला पाचारण करण्यात आले आहे. पंचनामा व इतर माहिती घेतल्या जाईल गळ्यावर पोटात चाकूचे वार केल्याची प्रथम दृष्ट्या दिसत आहे.