नागपूर : गेल्या काही काळापासून अधूनमधून पावसाची हजेरी लागते. त्यामुळे शहरातील वातावरणात सातत्याने बदल होत आहेत. रविवारपर्यंतच्या पावसाळी वातावरणानंतर सोमवारपासून शहरातील वातावरण परत एकदा कोरडे झाले आहे. मात्र, गुरुवारी शहर आणि विदर्भात परत एकदा हलक्या सरींची हजेरी लागण्याची शक्यता प्रादेशिक हवामान खात्याने वर्तविली आहे. यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या शेतमालाची काळजी घ्यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

इतकंच नाहीतर शुक्रवारपासून वातावरण पुन्हा एकदा कोरडं होण्याची शक्यता आहे. दरम्यान, मंगळवारी शहरात १२.४ अंश इतक्या किमान तर ३४ अंश इतक्या कमाल तापमानाची नोंद करण्यात आली. दरम्यान, पुण्यात मंगळवारी सायंकाळी ३५.४ अंश सेल्सियस कमाल तापमानाची नोंद झाली. किमान तापमान १२.४ अंश नोंदवले गेले. त्यामुळे पुणेकरांना हिवाळा आणि उन्हाळा अशा दोन्ही ऋतुंचा अनुभव एकत्र घ्यायला मिळत असल्याचे दिसून आले आहे.

धक्कादायक! एकमेकांना मिठीत घेत विवाहित प्रेमयुगलाने संपवलं जीवन, कारण वाचून हादराल…
पुढील दोन ते तीन दिवस परिस्थिती अशीच काहीशी राहील, असा अंदाज पुणे वेधशाळेकडून वर्तवण्यात आला आहे. शहरात कमाल तापमानात गेल्या दोन दिवसांपासून मोठी वाढ झाली आहे. फेब्रुवारी महिन्यातील सरासरीपेक्षा हे तापमान दोन ते तीन अंश अधिक नोंदवण्यात आले आहे. कमाल तापमानाने गुरुवारी ३५ अंशांच्या पुढचा टप्पा गाठला. याच वेळी किमान तापमानात वाढ होत नसल्याचे दिसून येत आहे. मंगळवारी १२.५ अंश सेल्सियस किमान तापमानाची नोंद झाली.

निसर्गाच्या अवकृपेमुळे शेतकरी पुन्हा अडचणीत, ४ कोटीचे झाले नुकसान
उकाड्यात वाढ झाली असली, तरी रात्री आणि पहाटेच्या सुमारास थंडी जाणवत असल्याचे चित्र आहे. त्यात आज (बुधवार) आणि उद्या (गुरुवार) सकाळच्या वेळेला काही काळ धुके पसरेल, असाही अंदाज वेधशाळेकडून वर्तवण्यात आला आहे. तापमानात सातत्याने होणाऱ्या या बदलांमुळे आणखी काही दिवस पुणेकरांना थंडीसह उकाड्याचाही अनुभव घ्यावा लागणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here