औरंगाबाद : कन्नड तालुक्यातील जेहूर व निपाणी शिवारात एका पिसाळलेल्या कुत्र्याने धुमाकूळ घातला असून, परिसरातील शेतवस्तीवरील चार लहान मुलांसह सहा जणांना या कूत्र्याने चावा घेऊन गंभीररित्या जखमी केले. त्यामुळे परिसरातील लोकांमध्ये मोठ्या दहशतीच वातावरण आहे.
गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सांयकाळी जेहूर शिवारातील खैरनार व पवार कुटूंबाच्या शेतवस्तीवर तसेच निपाणी शिवारात एका पिसाळलेल्या कुत्र्याने धुमाकूळ घातला. दिसेल त्यावर धाव तोंडाचे लचके तोडत अनेकांना या कुत्र्याने जखमी केलं आहे. या कुत्र्याच्या हल्ल्यात विद्या बाळासाहेब खैरनार (वय६ ), श्रुती बाळासाहेब खैरनार (वय ४),ऋचा महेश खैरनार (वय ३),रविंद्र पवार (वय ४), रामेश्वर साळुबा बोरसे ( वय २०), आयुश गोविंद बोरसे ( वय ६) जखमी झाले आहेत. दुष्काळात तेरावा महिना! आधीच भाव नाही त्यात चोरट्यांचा मोसंबीवर डाव सर्व लहान मुलं खेळत असताना पिसाळलेल्या कुत्र्याने अचानकपणे हल्ला केला. ज्यात ही मुलं गंभीर जखमी झाले आहेत. यात मुलींच्या चेहर्यावर व डोळ्या लगत गंभीर जखमा झालेल्या आहेत. जखमींवर प्राथामीक आरोग्य केद्रामध्ये प्रथमोपचार करून त्यानंतर औरंगाबाद येथे उपचारासाठी हलवण्यात आले आहे. तर पिसाळलेल्या कुत्र्याच्या अचानक हल्ल्याने या परिसरातील ग्रामस्थ भयभीत झाले आहेत.