नागपूर : राज्यातील सर्व दुकानांचे फलक मराठीत करण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला आहे. मात्र, शहरातील बहुतांश व्यापाऱ्यांनी त्याचे पालन केलेले नाही. येत्या शुक्रवारपर्यंत व्यापाऱ्यांनी हे मराठीत फलक करावे, असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस हेमंत गडकरी यांनी केले आहे. या आवाहनाला प्रतिसाद न देणाऱ्यांच्या दुकानांचे आम्ही आमच्या पद्धतीने नामकरण करू, असा इशारा गडकरी यांनी दिला आहे.

कविवर्य वि. वा. शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांची जयंती ‘मराठी भाषा गौरव दिवस’ म्हणून साजरी केली जाते. या दिनाचे औचित्य साधून मराठीत नामफलक असावे, यासाठी अतिरिक्त कामगार आयुक्तांसह सर्व व्यापारी व दुकानदारांना मनसेने निवेदन दिले आहे. पूर्व नागपुरात ३१७, दक्षिणमध्ये २२० आणि मध्य विभागात २९८ दुकानांना मराठी फलक लावण्याची विनंती करण्यात आली. येत्या पाच दिवसात मराठीत फलक न केल्यास आम्ही आमच्या पद्धतीने मराठीत नामकरण करू, असेही हेमंत गडकरी यांनी स्पष्ट केले.

Weather Alert : राज्यात पुन्हा पावसाची वातावरण, उद्या ‘या’ जिल्ह्यांसाठी हवामान खात्याचा इशारा
पत्रकार परिषदेला शहराध्यक्ष अजय ढोके, विशाल बडगे, सचिव घनश्याम निखाडे, विभागाध्यक्ष उमेश उतखेडे, शशांक गिरडे, गौरव पुरी, लोकेश कामडी, अंकित झाडे, शुभम पिंपळापुरे आदी उपस्थित होते.

धक्कादायक! एकमेकांना मिठीत घेत विवाहित प्रेमयुगलाने संपवलं जीवन, कारण वाचून हादराल…

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here