कीव, युक्रेन :

रशियाच्या हल्ल्याचा आणि बंडखोरांचा धोका लक्षात घेऊन युक्रेनच्या सुरक्षा परिषदेनं राष्ट्रीय आणीबाणीची स्थिती घोषित करण्याच्या योजनेला मान्यता दिली आहे.

याअगोदर, युक्रेनच्या सर्वोच्च सुरक्षा अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, युक्रेनच्या पूर्वेकडील डॉनेत्स्क आणि लुहांस्क हे दोन बंडखोर प्रदेश वगळता सर्व युक्रेनियन प्रदेशात आणीबाणी लागू केली जाणार आहे. युक्रेनच्या उच्च सुरक्षा अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, आणीबाणीची परिस्थिती ३० दिवसांपर्यंत लागू राहील. गरज भासल्यास यात आणखीन ३० दिवसांची वाढ केली जाईल.

सोमवारी रात्री टीव्हीवरून देशाला संबोधित करताना रशियन अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी परस्पर पूर्व युक्रेनमधील दोन रशियन समर्थित फुटीरतावादी प्रदेश – डॉनेत्स्क आणि लुहांस्क – पीपल्स रिपब्लिक अर्थात ‘स्वतंत्र देश’ म्हणून मान्यता देत असल्याची घोषणा केली होती. तसंच रशियानं ‘डॉनबास’च्या डॉनेत्स्क आणि लुहांस्क या दोन्ही बंडखोर भागांत आपले लष्कर तैनात करण्याचेही आदेशही दिले आहेत.

पुतीन यांच्या म्हणण्यानुसार, रशियन सैन्य पूर्व युरोपमध्ये प्रवेश करून फुटीरतावादी प्रदेशांत शांतता प्रस्थापित करण्यासाठी काम करणार आहेत. पुतीन यांच्या या निर्णयानंतर रशिया-युक्रेन तणाव शिगेला पोहोचला आहे.

Vladimir Putin: व्लादिमीर पुतीन एलन मस्कहून अधिक श्रीमंत? ४३ विमानं, ७००० गाड्या आणि बरंच काही….
India on Ukraine Crisis: रशिया – युक्रेनच्या सीमेवरचा तणाव चर्चेनच सुटू शकतो, भारतानं भूमिका केली स्पष्ट
रशियावर अनेक देशांकडून निर्बंध

रशियाच्या या निर्णयानंतर अनेक देशांनी रशियावर आर्थिक निर्बंध जाहीर करण्याची घोषणा केलीय. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी VEB आणि रशियन मिलिटरी बँक या दोन वित्तीय संस्थांवर निर्बंध लादण्याची घोषणा केली. तसंच रशियन अर्थव्यवस्थेचे काही भाग आंतरराष्ट्रीय वित्तीय व्यवस्थेतून काढून टाकले जात असल्याचंही बायडेन यांनी म्हटलं. यासोबतच रशियातील उच्च वर्ग आणि त्यांच्या कुटुंबीयांवरही निर्बंध लादले जाऊ शकतात.

जर्मनीनंही रशियाकडून ‘नॉर्ड स्ट्रीम २’ गॅस पाइपलाइनची प्रमाणीकरण प्रक्रिया रोखण्याची कारवाई सुरू केलीय. मॉस्कोसाठी हा एक फायदेशीर करार होता.

PM Imran Khan: पंतप्रधानांच्या मुलाच्या गाडीत आढळली दारू, FIR दाखल
Rehman Malik Death: पाकिस्तानचे माजी गृहमंत्री रहमान मलिक यांचं करोनानं निधन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here