नागपूर: ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी नऊ मिनिटे दिवे बंद करण्याचे केलेले आवाहन घातक असून, त्यामुळे वीजनिर्मिती बंद पडू शकते ‘ असा दावा उर्जामंत्री नितीन राऊत यांनी केला आहे. पंतप्रधान देशाला ‘एप्रिल फूल’ बनवित आहेत. कुणीही दिवे बंद करू नये, असेही ते म्हणाले.

मोदींच्या घोषणेवर राऊत म्हणाले की, एकाच वेळी सगळ्यांनी दिवे व पंखे बंद केले तर ग्रीड हाय फ्रिक्वेन्सीवर ट्रिप होऊ देशातील सर्व वीजनिर्मिती केंद्रे बंद पडतील. मोठे नुकसान होऊ शकेल. पुन्हा पुरवठा सुरळीत करण्यासाठी अनेक तास लागतील. लोकांनी या आवाहनास प्रतिसाद देऊ नये. करोनासारख्या प्रादुर्भावाशी लढताना ते वैज्ञानिक भूमिका घेत नसून दिवे लावण्याचे आवाहन करीत आहेत, हे अयोग्य आहे. करोनाच्या काळातला हा अयोग्य इव्हेन्ट असल्याची टीका त्यांनी केली आहे.

आम्ही धान्य वाटणार : वडेट्टीवार

‘पंतप्रधान देशातील लोकांना काही महत्त्वाचे आवाहन करतील, महत्त्वाची घोषणा करतील, असे वाटले होते. मात्र, त्यांनी फक्त दिवाबत्तीची घोषणा केली. त्याने करोना दूर होणार आहे का? आम्ही उद्या चंद्रपूर जिल्ह्यात ४० हजार गरजूंना धान्यवाटप करणार आहोत. मोदींनीदेखील भाजप कार्यकर्त्यांना अशाच प्रकारे मदत करण्याचे आदेश द्यायला हवे होते. त्यांनी तसे न करता दिवे, मेणबत्ती लावण्याचे आदेश देऊन अंधश्रद्धा पसरविण्याचा प्रयत्न केला आहे,’ अशी टीका ओबीसी विभागाचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here