मॉस्को, रशिया :

युक्रेन आणि रशिया आता प्रत्यक्ष रणांगणात एकमेकांसमोर उभे ठाकल्याचं चित्र निर्माण झालंय. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी युक्रेनविरुद्ध लष्करी करावाई करण्याची घोषणा केलीय. युक्रेन आणि रशियाचं युद्ध टाळलं जाऊ शकत नाही, असंही वक्तव्य पुतीन यांनी केलंय. त्यामुळे, रशियाचा प्रत्यक्ष युद्धाचा मनसुबा आता उघडपणे समोर आलाय.

रशियाकडून स्पेशल मिलिटरी ऑपरेशन लॉन्च केलं जात असल्याचं पुतीन यांनी म्हटलंय. ‘युक्रेनचं निशस्त्रीकरण’ हे पुतीन यांचं ध्येय आहे. युक्रेनच्या लष्करानं शस्त्रास्त्र टाकून घरी निघून जावं, असं आव्हान देत पुतीन यांनी युक्रेनला शरणागती पत्करण्यास सांगितलंय.

युक्रेनवर कब्जा मिळवण्याचा आपला कोणताही हेतू नसल्याचं पुतीन यांनी म्हटलंय. यापूर्वी, युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी गुरुवारी
‘येत्या काही दिवसांत रशिया युरोपमध्ये मोठ्या युद्धाला सुरूवात करू शकतं’ अशी शक्यता वर्तवली होती.

याच घडामोडींदरम्यान अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन यांनी युद्धाच्या भीतीनं रशियाच्या समकक्षासोबतची बैठक रद्द केली. सोबतच, ‘रशियाने आधीच केलेल्या अपराधांची किंवा ज्या अपराधांची त्यांची योजना आहे त्याबद्दल त्यांना दंड देण्यासाठी जगानं आपल्या सर्व आर्थिक सामर्थ्यासहीत प्रत्यूत्तर द्यायला हवं, असं आवाहन ब्लिंकेन यांनी जगाला केलं होतं.

दुसरीकडे, संयुक्त राष्ट्राकडून रशियाला हल्ला रोखण्याचं आवाहन करण्यात आलंय.

Ukraine Crisis: युक्रेनचे नागरिकही रणांगणात; १८ ते ६० वयोगटातील नागरिकांना वर्षभर लष्कराची सेवा अनिवार्य
Emergency in Ukraine: युक्रेनमध्ये आणीबाणी लागू, देशाच्या सुरक्षा परिषदेची मंजुरी
Vladimir Putin: व्लादिमीर पुतीन एलन मस्कहून अधिक श्रीमंत? ४३ विमानं, ७००० गाड्या आणि बरंच काही….

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here