नवाब मलिक यांनी समीर वानखेडे आणि मोहित कंबोज यांचे संबंध असल्याचा खुलासा केला होता. त्यावेळी सर्वप्रथम मोहित कंबोज यांचे नाव उजेडात आले होते. | Nawab Malik vs Mohit Kamboj

 

Malik kamboj

मोहित कंबोज आणि नवाब मलिक

हायलाइट्स:

  • नवाब मलिक यांना अटक करण्यात आली आहे
  • नवाब मलिक यांना सात दिवसांची ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्या अटकेनंतर जल्लोष करणे मोहित कंबोज यांना महागात पडले आहे. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकारानंतर मुंबई पोलीस बुधवारी रात्री मोहित कंबोज यांच्या घरीही गेले होते. त्यानंतर सांताक्रुझ पोलीस ठाण्यात मोहित कंबोज यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. कोविड नियमांचे उल्लंघन आणि सार्वजनिक ठिकाणी तलवार काढल्याबद्दल हा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे समजते. नवाब मलिक यांना अटक झाल्यानंतर महाविकासआघाडी प्रचंड आक्रमक झाली आहे. त्यामुळे भाजप नेते किंवा त्यांच्याशी संबंधित कोणाचीही वेडीवाकडी कृती खपवून घेतली जाणार नाही, असा संदेशच मोहित कंबोज यांच्यावरील कारवाईच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न झाला आहे.
Nawab Malik: नवाब मलिक कोर्टात मुलीला म्हणाले, आता लढाईला तोंड फुटलंय, आता लढायचंच!
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्याशी असलेल्या कनेक्शनप्रकरणी नवाब मलिक यांना अटक करण्यात आली आहे. नवाब मलिक यांना सात दिवसांची ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. यादरम्यान ईडी अधिकाऱ्यांकडून नवाब मलिक यांची कसून चौकशी होईल. दरम्यान, मोहित कंबोज यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेत नवाब मलिक यांच्यावर आणखी काही खळबळजनक आरोप केले. नवाब मलिक हे डान्सबार आणि वेश्या व्यवसायाचे रॅकेटमध्ये सहभागी असल्याचा दावा मोहित कंबोज यांनी केला. या सगळ्याचे पुरावे आपण तपास यंत्रणांना देणार असल्याचे मोहित कंबोज यांनी सांगितले. त्यामुळे आता नवाब मलिक यांच्यावर आणखी काही कारवाई होणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
नवाब मलिक डान्सबार चालवायचे, बांगलादेशी मुलींना भारतात आणून वेश्या व्यवसायात ढकलायचे: मोहित कंबोज
आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात नवाब मलिक यांनी अनेक गौप्यस्फोट केले होते. त्यावेळी नवाब मलिक यांनी समीर वानखेडे आणि मोहित कंबोज यांचे संबंध असल्याचा खुलासा केला होता. त्यावेळी सर्वप्रथम मोहित कंबोज यांचे नाव उजेडात आले होते. तर काही दिवसांपूर्वी संजय राऊत यांनी भाजपवर अनेक आरोप केले होते. त्यावेळी मोहित कंबोज हे देवेंद्र फडणवीस यांचे फ्रंट मॅन असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला होता. राऊत आणि मलिकांवर टीका करताना मोहीत कंबोज सलीम जावेदची जोडी असे करायचे.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : mohit kamboj shows sword after nawab malik arrest by ed police filed fir
Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here