मॉस्को, रशिया :

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन गुरुवारी सकाळीच युक्रेनमध्ये विशेष लष्करी कारवाईची घोषणा करत युद्धगर्जना केलीय. सोबतच, रशियन सैन्याकडून युक्रेनमध्ये हल्ल्यांची सुरूवातही झाल्याचं दिसून येतंय. युक्रेनची राजधानी ‘कीव’ स्फोटांच्या आवाजांनी गोंधळून गेलीय. दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्याकडून पुतीन यांनी परिणामांना सामोरं जाण्यास तयार राहण्याची धमकी देण्यात आलीय. या युद्धामुळे भयंकर विनाश होईल, असंही बायडेन यांनी म्हटलंय. तर दुसरीकडे, पुतीन यांनी ‘युक्रेन-रशिया युद्धात कोणत्याही देशानं घुसण्याचा प्रयत्न केला तर त्याचे भयंकर परिणाम दिसून येतील’ अशी धमकी दिलीय. रशिया स्वत:च्या संरक्षणासाठी काहीही करण्यास तयार असल्याचंही पुतीन यांनी स्पष्ट केलंय. यामुळेच, अण्वस्त्रांनी सज्ज रशिया आणि नाटो आता आमनेसामने आले आहेत.

व्लादिमीर पुतीन यांच्याकडून युद्धगर्जना

गुरुवारी सकाळी रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी विशेष लष्करी कारवाईच्या निर्णयाची माहिती देशवासियांना दिली. दूरचित्रवाणीवरून केलेल्या एका भाषणात त्यांनी देशासहीत जगालाही संदेश दिलाय.

Russia Ukraine War: व्लादिमीर पुतीन यांच्याकडून युद्धघोषणा, युक्रेनला शरणागती पत्करण्याचं आवाहन
Russia Ukraine War: रशियाला हल्ल्यापासून रोखावं, युक्रेनची जगाकडे मदतीची मागणी

काय म्हटलं पुतीन यांनी आपल्या भाषणात?

‘युक्रेनच्या रहिवाशांना नेमकं कुठे राहण्याची इच्छा आहे? असा प्रश्न कधीही विचारण्यात आला नाही. याबद्दल निर्णय घेण्याचा आपल्या सगळ्यांचा अधिकार आहे. आम्ही क्रिमियाच्या नागरिकांचंही संरक्षण केलं आणि आता युक्रेनच्या नागरिकांचंही करणार. आम्ही स्वसंरक्षणार्थ काम करत आहोत. आमच्याविरुद्ध धोकादायक कारवाई सुरु करण्यात आलीय. आपण लवकरच या दुःखद काळातून बाहेर पडू. मात्र या काळात बाहेरच्यांचा हस्तक्षेप आम्ही खपवून घेणार नाही. मी युक्रेनियन लष्कराला सांगू इच्छितो की तुमच्या वडील आणि आजोबांनी आपल्या लढाईत योगदान दिलंय. तुम्हीही शस्त्रास्त्र खाली ठेवा आणि घरी निघून जावं. युक्रेनच्या अशा सर्व सैनिकांना सुरक्षित घरी पोहोचवलं जाईल. युक्रेन सैनिकांनी असं केलं नाही तर त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील आणि याची जबाबदारी ‘कीव’वर असेल.

सध्या जे काही घडतंय, त्यात कोणत्याही परकीय देशाचा शिरकाव झाला, तर त्यालाही सडेतोड उत्तर दिलं जाईल आणि त्यानंतर घडेल ते आत्तापर्यंत इतिहासानं पाहिलेलं नसेल. मला आशा आहे की माझा आवाज तुम्हााल ऐकू जाईल.

आमच्या प्रिय रशियन नागरिकांनो, ही वेळ एकत्र उभं ठाकण्याची आहे. लष्कर कारवाईसाठी पुढे जाईल. अमेरिका खोट्यांचं साम्राज्य आहे. त्यांच्याकडे बोथट सैन्य आहे पण मेंदू नाही. पण आमच्याकडे बुद्धी आहे. आम्ही आमच्या सार्वभौमत्वाच्या रक्षणासाठी लढण्यासाठी तयार आहोत. मला खात्री आहे की, रशियन सैन्य आपलं कार्य व्यावसायिक पद्धतीने पूर्ण करेल. आम्ही सामाजिक सुरक्षा, आर्थिक क्षेत्रांची काळजी घेत आहोत. रशियाचं भविष्य सुरक्षित हातात आहे. जो काही निर्णय घेतला आहे, त्याचं उद्दीष्ट पूर्ण केलं जाईल.

मला आशा आहे की तुम्ही माझ्या निर्णयाला पाठिंबा द्याल’

Ukraine Crisis: युक्रेनचे नागरिकही रणांगणात; १८ ते ६० वयोगटातील नागरिकांना वर्षभर लष्कराची सेवा अनिवार्य
Emergency in Ukraine: युक्रेनमध्ये आणीबाणी लागू, देशाच्या सुरक्षा परिषदेची मंजुरी
Vladimir Putin: व्लादिमीर पुतीन एलन मस्कहून अधिक श्रीमंत? ४३ विमानं, ७००० गाड्या आणि बरंच काही….

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here