हा जमिनीचा व्यवहार ५५ लाख रुपयांचा आहे. याप्रकरणात झालेले आरोप पाहता ही मुळात सिव्हिल केस असायला हवी होती. पण याठिकामी मनी लाँडरिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, याकडे निलोफर मलिक यांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. त्या गुरुवारी मुंबईतील पत्रकारपरिषदेत बोलत होत्या.

जमिनीचा व्यवहार झाला तेव्हा नवाब मलिक महसूल मंत्री होते, असे रिमांड कॉपीत नमूद करण्यात आले आहे.
हायलाइट्स:
- हा जमिनीचा व्यवहार ५५ लाख रुपयांचा आहे
- ही मुळात सिव्हिल केस असायला हवी होती
यावेळी निलोफर मलिक यांनी ईडीच्या अधिकाऱ्यांनी आपल्या वडिलांना खोटं सांगून चौकशीसाठी नेल्याचाही दावा केला. सकाळी सहाच्या सुमारास ईडीचे अधिकारी आमच्या घरी आले. त्यांनी आमच्याकडे सर्च वॉरंट असल्याचे सांगितले. तेव्हा आम्ही त्यांना घराची झडती घेण्यास सांगितले. त्यानंतर ईडीच्या अधिकाऱ्यांना माझ्या वडिलांना तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असल्याने कार्यालयात यावे लागेल, असे सांगितले. त्याला माझ्या वडिलांनी होकार दर्शविला. ते स्वत:च्या गाडीत बसून ईडी कार्यालयात गेले. मात्र, त्याठिकाणी गेल्यानंतर ईडीच्या अधिकाऱ्यांना त्यांच्या हातात चौकशीचे समन्स ठेवले. त्यावर सही करण्यास सांगितले. तेव्हा माझ्या वडिलांनी समन्सवर सही करण्यास नकार दिला. त्यानंतर ईडीने चौकशी करून त्यांना ताब्यात घेतले, असा आरोप निलोफर मलिक यांनी केला.
‘दाऊदशी नाव जोडता, मुसलमान म्हणून आम्हाला स्वतंत्र ओळख नाही का?’
यावेळी निलोफर मलिक यांना नवाब मलिक यांच्या डी गँगशी संबंध असल्याविषयी विचारणा करण्यात आली. त्यावर निलोफर मलिक यांनी म्हटले की, मुस्लीम व्यक्तीचे नाव दाऊदशी जोडले जाते. पण आम्हाला मुसलमान म्हणून स्वतंत्र ओळख नाही का, असा सवाल निलोफर मलिक यांनी विचारला. तसेच भाजप नेत्यांच्या टीकेकडे आम्ही लक्ष देत नाही. आमच्या कुटुंबातील एकही व्यक्ती घाबरलेली नाही. आम्ही याविरोधात लढा देऊ. लवकरच माझे वडील बाहेर येतील, असे निलोफर मलिक यांनी सांगितले.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
या बातम्यांबद्दल अधिक वाचा
Web Title : ed presented fabricated documents against nawab malik d gang connection says nilofer malik khan
Marathi News from Maharashtra Times, TIL Network
Marathi News from Maharashtra Times, TIL Network