नवी दिल्लीः देशातील करोनाच्या रुग्णांची संख्या गेल्या २४ तासांत मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. पाचशेच्या जवळ ४८७ करोना रुग्ण वाढले आहेत. यामुळे देशातील करोना रुग्णांची संख्या २५४७पर्यंत गेली आहे. करोनाने देशात आतापर्यंत ६२ जणांचा मृत्यू झाला आहे. नवीन वाढलेले रुग्ण हे तबलीघी जमातमधील आणि त्यांच्या संपर्कात आलेले असल्याचं सांगण्यात येतंय.

दिल्लीत करोनाचे ३८६ रुग्ण, तबलीघी जमातचे २५९

दिल्लीत करोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झालीय. दिल्लीतील करोना रुग्णांची संख्या ३८६वर गेलीय. दिल्लीत शुक्रवारी करोनाचे आणखी ९३ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. यापैकी २५९ रुग्ण हे तबलीघी जमातचे आहेत. तर दिल्लीत करोनाने मृत्यू झालेल्यांची संख्या ६ वर पोहोचली आहे. दिल्लीत अजूनही करोनाचा संसर्ग हा समूह स्तरावर गेलेला नाही. आणि अशी परिस्थिती निर्माण झाली तर सरकारची तयारी पूर्ण आहे, असं मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सांगितलं. केजरीवाल यांनी व्हॉट्सअॅप हेल्पलाइन नंबर जारी केलाय. 8800007722 या नंबरवरून जेवणाची आणि राहण्याची व्यवस्था कुठे करण्यात आली आहे यासह इतरही माहिती घेता येईल.

गुजरातमध्ये ९५ करोना रुग्ण

गुजरातमध्ये शुक्रवारी करोनाचे आणखी ७ रुग्ण आढळून आले. यामुळे गुजरातमधील करोना रुग्णांची संख्या ९५पर्यंत गेली आहे. तर आतापार्यंत ९ जणांचा करोनाने मृत्यू झाला आहे. अहमदाबादमध्ये एका ७ वर्षांच्या मुलीला आणि १७ वर्षांच्या मुलाला करोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे.

गौतमबुद्ध नगरमध्ये ५० रुग्ण

गौतमबुद्ध नगरमध्ये आणखी दोन रुग्ण आढळले. ओमेक्स हाउसिंग सोसायटीतील २ रहिवासी करोना पॉझिटिव्ह आढळून आले. यामुळे तेथील करोना रुग्णांची संख्या ५० वर गेलीय. यापैकी ८ जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आलंय. ४२ जणांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, तेलंगणमध्ये ७५ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर आणखी दोन जणांचा करोनाने मृत्यू झाला आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here