मुंबई: ईडीच्या कोठडीत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्याविरोधात आरोपांची राळ उडवून देणारे मोहित कंबोज हे आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या भेटीला गेले आहेत. नवाब मलिक यांच्या अटकेनंतर बुधवारी मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांच्या निवासस्थानाबाहेर जल्लोष करण्यात आला होता. त्यावेळी मोहित कंबोज यांनी हवेत तलवार नाचवली होती. याप्रकरणी मोहित कंबोज यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आता मोहित कंबोज हे सागर बंगल्यावर देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेले आहेत. गेल्या काही दिवसांपासून मोहित कंबोज यांचे नाव सातत्याने चर्चेत आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मोहित कंबोज हे देवेंद्र फडणवीस यांचे फ्रंटमॅन असल्याचा आरोप केला होता. तर नवाब मलिक यांनीही समीर वानखेडे आणि मोहित कंबोज यांच्यातील संबंधांचा उल्लेख केला होता. त्यामुळे आता हवेत तलवार नाचवण्याचे प्रकरण साधे असले तरी राज्य सरकारकडून मोहित कंबोज यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मोहित कंबोज हे सल्लामसलत करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्यावर गेले असावेत, असा अंदाज आहे. या भेटीत आता काय घडणार, हे पाहावे लागेल.

नवाब मलिक डान्सबार चालवायचे, बांगलादेशी मुलींना भारतात आणून वेश्या व्यवसायात ढकलायचे: मोहित कंबोज
मुंबई पोलीस बुधवारी रात्री मोहित कंबोज यांच्या घरीही गेले होते. त्यानंतर सांताक्रुझ पोलीस ठाण्यात मोहित कंबोज यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. कोविड नियमांचे उल्लंघन आणि सार्वजनिक ठिकाणी तलवार काढल्याबद्दल हा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे समजते. मोहित कंबोज यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेत नवाब मलिक यांच्यावर आणखी काही खळबळजनक आरोप केले. नवाब मलिक हे पूर्वी डान्सबार आणि वेश्या व्यवसायाचे रॅकेटमध्ये सहभागी असल्याचा दावा मोहित कंबोज यांनी केला. या सगळ्याचे पुरावे आपण तपास यंत्रणांना देणार असल्याचेही कंबोज यांनी म्हटले होते.
Mohit Kamboj: मोहित कंबोज यांना तलवार नाचवणं पडलं महागात, पोलिसांकडून गुन्हा दाखल
महाविकासआघाडीचं धरणं आंदोलन

एकीकडे भाजपच्या गोटात हालचाली सुरु असताना महाविकास आघाडीतील मंत्री, पदाधिकारी आणि प्रमुख नेते मंत्रालयाशेजारी असणाऱ्या महात्मा गांधीजींच्या पुतळ्याशेजारी धरणे आंदोलनाला बसले आहेत. तर दुसरीकडे नवाब मलिक यांची बहीण सईदा खान या ईडी कोठडीत गेल्या आहेत. नवाब मलिक यांनी आपल्याला घरचे जेवण आणि औषधे मिळावीत, अशी विनंती केली होती. तत्पूर्वी काल रात्री नवाब मलिक यांना झोपण्यासाठी कोठडीत गादी आणि उशी देण्यात आली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here