नाशिक : मुलीचं लग्न जमत नसल्याने भोंदूबाबाकडे गेलेल्या महिलेसह तिच्या तीन मुलींवर भोंदूबाबा आणि त्याच्या भावाने बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. तब्बल २ वर्ष ४ महिने नराधम आरोपी सदर कुटुंबावर अत्याचार करत होते. याप्रकरणी पोलिसांनी बुधवारी रात्री उशिरा दोन्ही आरोपींवर गुन्हा दाखल करत त्यांना ताब्यात घेतलं आहे. (Nashik Rape Case)

मिळालेल्या माहितीनुसार, येवला तालुक्यातील एका तरुणीचं लग्न जमत नव्हते. त्यामुळे हतबल झालेल्या आईने अंधश्रद्धेतून अजीज अब्दुल बाबा याच्याकडे जाण्याचा निर्णय घेतला. हा बाबा आपल्याला अडचणीतून मार्ग काढायला मदत करेल, अशी आशा सदर महिलेला होती. मात्र या नराधमाने आणि त्याचा भाऊ जब्बार शेख याने चाकूचा धाक दाखवत महिलेसह तिच्या तीन मुलींवर बलात्कार केला.

joe biden : रशियाने युक्रेनवर हल्ला सुरू करताच अमेरिकेची मोठी घोषणा; सैन्य पाठवणार नाही, बायडन म्हणाले…

बलात्कारानंतर या आरोपींनी महिलेचे व्हिडिओही काढले होते. या व्हिडिओच्या माध्यमातून बदनामीची धमकी देत अनेक दिवस महिलेवर अत्याचार सुरू होते. अखेर पीडित महिलेने धाडस करून पोलिसांना याबाबतची माहिती दिली आणि त्यानंतर आरोपींवर गुन्हा दाखल झाला.

दरम्यान, या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात असून येवला शहर पोलीस अधिक तपास करत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here