नवी दिल्लीः एअर इंडियाने आजपासून या महिन्याच्या अखेरपर्यंत म्हणजे ३० एप्रिलपर्यंत कुठल्याही विमानांचे म्हणजे आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत विमानांचे बुकींग होणार नाही, असं जाहीर केलंय. बुकींग कधीपासून सुरू करायचं? याचा निर्णय १४ एप्रिलनंतर केंद्र सरकारच्या निर्णयावर अवलंबून असेल, असं एअर इंडियानं स्पष्ट केलं आहे.

करोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने देशात २१ दिवसांचा घोषित केला आहे. हा लॉकडाऊन १४ एप्रिलला संपणार आहे. यामुळे १४ एप्रिलनंतर काय होणार? लॉकडाऊनचा कालावधी वाढणार का? याची उत्सुकता संपूर्ण देशाला लागली आहे. पण आज एअर इंडियाने जाहीर केलेल्या निर्णयावरून लॉकडाऊन वाढण्याचे संकेत मिळत आहेत, असं बोललं जातंय.

या महिन्या ३० तारखेपर्यंत म्हणजे ३० एप्रिलपर्यंत कुठल्याही विमानाचे बुकींग होणार नाही. १४ एप्रिलपर्यंत देशात लॉकडाऊन आहे. या लॉकडाऊन संदर्भात केंद्र सरकार काय निर्णय घेतं त्यावर बुकींगचा निर्णय अवलंबून असेल. पण ३०एप्रिलपर्यंत विमानांचे बुकींग बंद असेल, असं एअर इंडियाने स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, एअर इंडियाचे पायलट्सनी संचालकांना पत्र लिहिलं आहे. पगार कपातीचा निर्णयात दुजाभाव केला गेला आहे. पगार कपातीतून संचालक आणि व्यवस्थापनातील मुख्य अधिकाऱ्यांना वगळण्यात आलं आहे. फक्त पायलट आणि कर्मचाऱ्यांवर ही पगार कपात लादली गेली. हा निर्णय आम्हाला अमान्य आहे, असं पायलट संघटनेने पत्रात म्हटलं आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here