उस्मानाबाद : भारतीय जनता पार्टीच्यावतीने जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्या नेतृत्वात अटकेत असलेले मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनामासाठी व महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने आंदोलन आज करण्यात आले. १९९३ बॉम्बस्फोटातील मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना आदरांजली वाहत आंदोलनाची सुरुवात करण्यात आली, तसेच महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणा देत मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणीही करण्यात आली.

कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांना ईडीने १९९३ बॉम्बस्फोटातील सहभागी गुन्हेगारांशी संबंधित मनी लाँडरिंग प्रकरणी अटक केली. कोर्टाने त्यांना ३ मार्चपर्यंत कोठडी दिली. अनिल देशमुखांचा राजीनामा ताबडतोब घेणारे शरद पवार, नवाब मलिकांच्या बाबतीत वेगळा निर्णय घेत आहेत. महाराष्ट्रातील राष्ट्रीय विचारांची जनता हे सहन करणार नाही.

शेतकऱ्यांवर पुन्हा अस्मानी संकट?; हवामान खात्याने दिला ‘हा’ इशारा
हा राष्ट्राच्या सुरक्षेचा विषय आहे, राष्ट्राच्या अस्मितेचा विषय आहे. त्यामुळे नवाब मलिकांचा राजीनामा होईपर्यंत निदर्शने करण्यात येतील, गुन्हेगारांना पाठीशी घालणारे हे सरकार आता जास्त काळ टिकणार नाही. अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान न देता तात्काळ त्यांचा राजीनामा घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अन्यथा भारतीय जनता पक्षाच्या वतीने आगामी काळात आंदोलने आणखी तीव्र करण्यात येईल असे आंदोलनकर्त्यानी सांगितलं आहे.

अनिल परबांची फाईल तयार, लवकरच गजाआड जातील; रवी राणांचा दावा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here