हिंगोली : मराठवाड्यात मागील दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण व ऊन सावलीचा खेळ सुरू असल्याने गहू, कांदा, हरभरा व इतर पीक उत्पादक शेतकऱ्यांवर चिंतेचे ढग निर्माण झाले आहेत. हे ढगाळ वातावरण हरभरा कांदा व गहू या पिकासाठी धोकादायक असल्याने शेतकऱ्यांपुढे प्रश्न निर्माण झाला आहे.

मराठवाड्यातील हिंगोली, परभणी, नांदेड, उस्मानाबाद, लातूर, बीड, जालना, औरंगाबाद जिल्ह्यातील काही भागात सध्याच्या स्थितित गहू, हरभरा व कांदा पीक उभे आहे. तर यापैकी काही ठिकाणी हरभरा व गहू पिकास कापणी सुरुवात झाली आहे. काही शेतकऱ्यांच्या शेतात कापून पिकांची पसार आहे. अशा स्थितीत ढगाळ वातावरण निर्माण झाल्यामुळे या शेतकऱ्यांचे आभाळाकडे डोळे लागले आहेत. पाऊस होऊन पिकांचे नुकसान होते की काय अशी चिंता या शेतकऱ्यांना सतावते आहे.

Weather Alert : राज्यात पुन्हा पावसाची वातावरण, उद्या ‘या’ जिल्ह्यांसाठी हवामान खात्याचा इशारा
उन्हाळा सुरु…

यापूर्वीही झालेल्या अवकाळी आणि अवेळी पावसामुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. हे नुकसान कधीही भरून न निघणारे होते. मागील आठवड्यापासून उन्हाचा पारा वाढला असून, सूर्यदेखील आग ओकू लागला आहे. वातावरणात असलेला गारवा अचानक निघून गेल्यामुळे अंगाची लाही लाही होताना दिसत आहे. अशी परिस्थिती असताना कालपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे.

हरभरा-कांदा पिकांना मोठा फटका

मध्यंतरीच्या कालावधीत धुके आणि वातावरणातील सतत होणाऱ्या बदलामुळे हरभरा-कांदा पिकांना मोठ्या प्रमाणावर फटका बसला. काही शेतकऱ्यांच्या शेतातील हरभऱ्याची घाटे हरभऱ्याच्या दाण्याने भरली नसून ती फोस राहिली आहेत. त्यामुळे उत्पादनात घट होत आहे. सोबतच कांदा पिकावर देखील बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.

रशिया-युक्रेन युद्धामुळे सोयाबीनचे दर वधारले का? ९० दिवसानंतर भाव वाढल्याने शेतकऱ्यांना फायदा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here