औरंगाबाद : शेतकऱ्यांच्या विजेच्या प्रश्नासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी गेल्या दोन दिवसांपासून कोल्हापूरच्या महावितरण कार्यालयासमोर आंदोलन करत आहेत. मात्र सरकारकडून त्यांच्या आंदोलनाची कोणतेही दखल घेतली जात नाही. त्यामुळे जर संध्याकाळपर्यंत या आंदोलनाची दखल घेतली नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील महावितरणचे कार्यालय ठिकाणावर राहणार नाही, असा इशारा स्वाभिमानीच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.

औरंगाबादच्या कन्नड तालुक्यातील औराळा येथील महावितरणाच्या कार्यालयावर आज ( गुरुवारी ) स्वाभिमानी संघटनेकडून आंदोलन करण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांना कृषीपंपाची वीज दिवसा देण्यात यावी. तसेच वाढीव वीजबिल शासनाने रद्द करावे, अशी मागणी करण्यात आली. तर गेंड्याच्या कातडीच्या सरकार राजू शेट्टी यांच्या आंदोलनाकडे हेतूपरस्सर दुर्लक्षित करत आहे. या सरकारला आम्ही इशारा देतो की, जर संध्याकाळपर्यंत या आंदोलनाची दखल घेतली नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील महावितरणचे कार्यालय ठिकाणावर राहणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवती आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष पूजा मोरे यांनी दिला.

Weather Alert : राज्यात पुन्हा हवामानाचा यू-टर्न, ‘या’ जिल्ह्यांत ढग दाटले; पावसाची शक्यता
तर पुढे बोलताना पूजा मोरे म्हणाल्यात की, दोन दिवसापासून माजी खासदार राजू शेट्टी यांचे आंदोलन सुरू असताना सरकारला जाग यायला तयार नाही. ईडीच्या घोटाळ्यामध्ये अडकलेल्या सरकारला शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला वेळ नाही. तर शेतकऱ्यांच्या विजेसंदर्भात राजू शेट्टी करत असलेल्या आंदोलनाला जाणीवपूर्वक दुर्लक्षित केलं जात असल्याचा आरोप सुद्धा मोरे यांनी केला. तर यावेळी औराळा येथील महावितरणच्या ३३ के.व्ही केंद्रावर महावितरणने दिलेल्या वाढीव बिलाची होळी सुद्धा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली.

रशिया-युक्रेन युद्धामुळे सोयाबीनचे दर वधारले का? ९० दिवसानंतर भाव वाढल्याने शेतकऱ्यांना फायदा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here