औरंगाबाद : मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना काल ईडीने अटक केली होती. त्यानंतर राज्यभरात राष्ट्रवादी कडून समर्थनात तर भाजपकडून मालिकांच्या राजीनाम्यासाठी आंदोलन सुरू आहे. त्यातच आता उद्या ( शुक्रवारी ) महाविकास आघाडीतील सर्व पक्ष एकत्रपणे रस्त्यावर उतरणार आहे. औरंगाबादमध्ये महाविकास आघाडीतील सर्वपक्षाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
भाजपकडूनही आंदोलन….
नवाब मलिक यांच्या विरोधात आज औरंगाबाद मध्ये भाजपकडून हे आंदोलन करण्यात आलं. औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भाजपकडून आंदोलन करत, नवाब मलिक यांचा राजीनामा घेण्याची मागणी करण्यात आली आहे. तर राष्ट्रवादीकडूनही मलिक यांच्या समर्थानात निदर्शने करण्यात आली.