पीएमएलए न्यायालयाने नवाब मलिक यांना ८ दिवसांची कोठडी सुनावली होती. त्यामुळे ३ मार्चपर्यंत नवाब मलिक हे ईडीच्या ताब्यात असतील. दाऊद कनेक्शनप्रकरणी सध्या त्यांची कसून चौकशी सुरू आहे. मात्र, नवाब मलिक हे चौकशीदरम्यान सहकार्य करत नसल्याचा माहिती ईडीच्या गोटातून बाहेर आली आहे.

 

Nawab Malik ED

नवाब मलिक

हायलाइट्स:

  • हा जमिनीचा सौदा ५५ लाख रुपयांना झाला होता
  • फराझ मलिक यांनी हसीन पारकर यांचा पाच लाख रुपयांचा धनादेश आणि ५० लाख रुपये रोख दिले होते
मुंबई: कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याच्याशी आर्थिक व्यवहार केल्याप्रकरणी आता अंमलबजावणी संचलनालयाकडून (ED) मलिक कुटुंबीयांना आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, ‘ईडी‘कडून नवाब मलिक यांचे पूत्र फराझ मलिक यांना चौकशीसाठी समन्स पाठवले जाण्याची शक्यता आहे. नवाब मलिक यांनी दाऊदची बहीण हसीना पारकर हिच्याकडून जमीन खरेदी केली होती. त्यावेळी फराझ मलिकही या व्यवहारात सहभाग होते. नवाब मलिक यांचे बंधू अस्लम मलिक आणि फराझ मलिक हे जमिनीच्या व्यवहाराचे पैसे देण्यासाठी हसीना पारकरच्या घरी गेले होते. हा जमिनीचा सौदा ५५ लाख रुपयांना झाला होता. फराझ मलिक यांनी हसीन पारकर यांचा पाच लाख रुपयांचा धनादेश आणि ५० लाख रुपये रोख दिले होते. त्यावेळी हसीना पारकरचा सहकारी सलीम पटेलही त्याठिकाणी उपस्थित होता. त्यामुळे आता या सगळ्याची माहिती घेण्यासाठी ईडीकडून फराझ मलिक यांची चौकशी होऊ शकते. त्यामुळे मलिक कुटुंबीय आणखी अडचणीत येण्याची शक्यता आहे. (NCP leader Nawab Malik ED interrogation)

भंगारवाला ते संजय गांधींचा खास नेता; मलिक पवारांपर्यंत कसे पोहोचले?


पीएमएलए न्यायालयाने नवाब मलिक यांना ८ दिवसांची कोठडी सुनावली होती. त्यामुळे ३ मार्चपर्यंत नवाब मलिक हे ईडीच्या ताब्यात असतील. दाऊद कनेक्शनप्रकरणी सध्या त्यांची कसून चौकशी सुरू आहे. मात्र, नवाब मलिक हे चौकशीदरम्यान सहकार्य करत नसल्याचा माहिती ईडीच्या गोटातून बाहेर आली आहे. त्यामुळे आता ईडी ३ मार्चला नवाब मलिक यांच्या कोठडीचा कालावधी आणखी वाढवून मागणार का, हे पाहावे लागेल. तसेच ईडी नंतर या प्रकरणात राष्ट्रीय तपासयंत्रणेची एन्ट्री होण्याचीही शक्यता आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी तसे संकेत दिले होते. नवाब मलिक यांची चौकशी पुढे जाईल, तशतशा आणखी तपास यंत्रणा यामध्ये सहभागी होऊ शकतात. दाऊदशी व्यवहार हा देशद्रोह आहे. त्यामुळे याप्रकरणात एनआयए देखील नवाब मलिक यांची चौकशी करू शकते. तसे घडल्यास नवाब मलिक यांचा तुरुंगातील मुक्काम आणि अडचणी दोन्ही वाढू शकतात.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : enforcement directorate ed likely to send summon to nawab malik son faraz malik
Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here