देवेंद्र फडणवीस हे नवाब मलिक यांच्यावर देशाच्या दुश्मनांशी व्यवहार केल्याचा आरोप करतात. हा प्रश्न चुकीचा नाही. दाऊद हा देशाचा दुश्मन आहेच, पण तसे नवाज शरीफही आहेत, इम्रान खानही आहेत. त्यांनीच दाऊदला लपून ठेवले आहे. पण त्याच नवाज शरीफला भेटण्यासाठी आणि मिठी मारण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे खास पाकिस्तानला जाऊन आले.

संजय राऊत, शिवसेना खासदार
हायलाइट्स:
- नवाब मलिक हे मोदी-शहा यांच्या मनमानीविरुद्ध आणि त्यांच्या नाझी फौजांविरुद्ध सातत्याने आवाज उठवत होते
- नवाब मलिक यांना अटक करून भाजपविरुद्ध बोलणाऱ्यांना ईडी, सीबीआयच्या फौजा चिरडून टाकतील, असाच संदेश देण्यात आला
देवेंद्र फडणवीस हे नवाब मलिक यांच्यावर देशाच्या दुश्मनांशी व्यवहार केल्याचा आरोप करतात. हा प्रश्न चुकीचा नाही. दाऊद हा देशाचा दुश्मन आहेच, पण तसे नवाज शरीफही आहेत, इम्रान खानही आहेत. त्यांनीच दाऊदला लपून ठेवले आहे. पण त्याच नवाज शरीफला भेटण्यासाठी आणि मिठी मारण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे खास पाकिस्तानला जाऊन आले. हिंमत असेल तर केंद्र सरकारने पाकिस्तानमध्ये घुसून दाऊदला खतम करावे अन्यथा फरफटत हिंदुस्थानात घेऊन यावे. पण हे लोक बार्बाडोसमधून भगोड्या मेहुल चोक्सीला भारतात आणू शकले नाहीत. तेथे दाऊदचे काय, अशी टीका ‘सामना’च्या अग्रलेखातून करण्यात आली आहे.
भंगारवाला ते संजय गांधींचा खास नेता; मलिक पवारांपर्यंत कसे पोहोचले?
नवाब मलिक हे मोदी-शहा यांच्या मनमानीविरुद्ध आणि त्यांच्या नाझी फौजांविरुद्ध सातत्याने आवाज उठवत होते. त्यांच्या खोटेपणाचा बुरखा फाडत होते. त्यामुळे नवाब मलिक यांना अटक करून भाजपविरुद्ध बोलणाऱ्यांना ईडी, सीबीआयच्या फौजा चिरडून टाकतील, असाच संदेश देण्यात आला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिक यांना तुरुंगात पाठवण्याचा पणच केला होता. नवाब मलिक यांच्या अटकेनंतर नाचणारे, तलवार नाचणारे पंटर्स आयुष्यभर तुरुंगात जातील, अशी प्रकरणे उघड होत असताना ईडीच्या नाझी फौजा त्याकडे दुर्लक्ष करतात. या लढाईत भाजपने नेहमीप्रमाणे पाठीमागून वार केला आणि विजयी असल्याचा आव आणला. भाजपच्या लोकांनी मुंबईत तलवारी उपसल्या, पण इतिहासाचे भान ठेवले तर लक्षात येईल की, तलवार चालवणारे शेवटी तलवारीच्या घावानेच मरतात. महाराष्ट्रातील ठाकरे सरकार अशा तलवारबाजीने पडणार नाही. एका कॅबिनेट मंत्र्यास गुंतवण्यासाठी जे कपट घडवले, तो लोकशाहीचा खून आहे. नवाब मलिक यांनी ईडीच्या कार्यालयातून बाहेर पडताना झुकणार नाही, लढत राहीन आणि जिंकेन, असा नारा दिला. त्यामुळे हिटलरच्या नाझी फौजांचा पराभव अटळ आहे, असे शिवसेनेने म्हटले आहे.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
या बातम्यांबद्दल अधिक वाचा
Marathi News from Maharashtra Times, TIL Network