नवी दिल्ली: करोना फैलावाच्या पार्श्वभूमीवर ”चं निझामुद्दीन ” प्रकरण समोर आल्यानंतर अवघ्या देशालाच धक्का बसला. परंतु, आता मात्र तबलीघी जमातच्या अडचणींत वाढ होताना दिसतेय. दिल्ली पोलिसांनी मरकझचे अध्यक्ष कंधालवी यांच्यासहीत जमातच्या कोअर कमिटीच्या सात सदस्यांना नोटीस धाडली आहे.

‘तबलीघी जमात’शी निगडीत चौकशी करताना पोलिसांच्या टीमलाही काळजी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. कारण, यातील उपस्थित करोनाबाधित असल्याची शक्यता नाकारता येत नाही.

पोलिसांनी कोअर कमिटीकडे मरकझ आणि निजामुद्दीन स्थित मुख्यालयाचं फंडिंग कुठून येतं? याबद्दल माहिती देण्याची मागणी केलीय. जमातनं गेल्या तीन वर्षांत किती कर भरला आहे? त्यांच्या खात्यांत कुठून आणि किती पैसे आले? या माहितीसोबतच पॅन क्रमांकाचीही मागणी करण्यात आलीय. मौलाना साद आणि ‘मरकझ’च्या इतर सहा सदस्यांना ११ ते १३ मार्च रोजी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या भारतीय आणि परदेशी नागरिकांची माहिती देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

एवढा मोठा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी पोलिसांची परवानगी घेतली होती का? अशीही विचारणा मरकझच्या सदस्यांकडे करण्यात आलीय. तसंच त्यांनी कमिटी सदस्य आणि मरकझच्या कर्मचाऱ्यांची यादीही पोलिसांना द्यावी लागणार आहे.

१ जानेवारी ते १ एप्रिलपर्यंत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या लोकांची संख्या, नकाशा किंवा साईट प्लान आणि परिसरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्हींचीही माहिती ‘जमात’ला द्यावी लागणार आहे. १२ मार्चनंतर सहभागी झालेल्या लोकांच्या माहितीसहीत ऑडिओ किंवा व्हिडिओ रेकॉर्डिंग तसंच ओरिजनल रजिस्टरचीही पोलिसांनी मागणी केलीय.

तसंच या कार्यक्रमा दरम्यान किती लोक आजारी पडले होते? त्यांच्यावर कुणी उपचार केले? लॉकडाऊनमुळे ‘मरकझ’मध्ये अडकलेल्या लोकांच्या सुटकेसाठी कोणकोणते प्रयत्न करण्यात आले होते? याबद्दलही मौलाना साद आणि त्यांच्या कमिटी सदस्यांना माहिती द्यावी लागणार आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here