वॉशिंग्टन, अमेरिका :

रशिया युक्रेन सीमेवर तणावात भर घालणाऱ्या आणि युक्रेनच्या पाठिशी उभं राहण्याची वल्गना करणाऱ्या अमेरिकेनं प्रत्यक्ष युद्ध सुरू झाल्यानंतर मात्र बघ्याची भूमिका स्वीकारलीय. मात्र, अमेरिकेच्या या भूमिकेचा नागरिकांकडून निषेध करण्यात येतोय. शेकडो आंदोलक अमेरिकेन राष्ट्राध्यक्षांच्या निवासस्थानाबाहेर ‘व्हाईट हाऊस‘ बाहेर गोळा झाले आहेत.

युक्रेनवर हल्ला करणाऱ्या रशियन लष्कराला रोखण्यासाठी त्वरीत योग्य ती पावलं उचलावीत अशी मागणी आंदोलकांनी केलीय.

व्हाईट हाऊसच्या बाहेर उपस्थित असणाऱ्या आंदोलकांनी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्याकडे रशियावर निर्बंध लावण्याची, रशियाला युद्ध संपुष्टात आणण्याचं आवाहन करण्याची आणि युक्रेनचं संरक्षण करण्याची मागणी केलीय.

रशिया-युक्रेन सीमेवरून सुरू झालेल्या वादाचं आता युद्धात रूपांतर झालंय. दोन्ही देशांमधील तणाव लक्षणीयरित्या वाढला आहे. रशियानं युक्रेनवर लष्करी कारवाई सुरू केली आहे. अमेरिकेतील व्हाईट हाऊसबाहेर जमलेले शेकडो निदर्शक या हल्ल्याचा निषेध करत आहेत.

रशिया-युक्रेन युद्धाचे भयाण वास्तव समोर; पहिल्या दिवशी १३७ जणांचा मृत्यू?
Russia Ukraine Crisis: बायडन यांची पुतीन यांना धमकी; ‘तुम्ही युद्धाचा पर्याय निवडला, आता…’
अमेरिकेकडून रशियावर निर्बंध

दरम्यान, रशियानं युक्रेनवर केलेल्या हल्ल्यानंतर अमेरिकेनं रशियावर नवीन निर्बंध लादण्याची घोषणा केलीय. व्लादिमीर पुतीन यांनी युद्धाची निवड केली असली तरी व्लादिमिर पुतीन यांना याची मोठी किंमत रशियन जनतेला चुकवावी लागेल, असा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी दिला आहे. बायडेन यांनी गुरुवारी रशियावर कठोर आर्थिक निर्बंधांची घोषणा केली आहे.

रशियाच्या चार प्रमुख बँकांना त्यांच्या आणि पाश्चात्य देशांनी लादलेल्या निर्बंधांचा फटका बसणार आहे. तसंच आपली रशियाचे समकक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी संवाद साधण्याची कोणतीही योजना नाही, असं ‘व्हाईट हाऊस’मधून प्रसारमाध्यमांना संबोधित करताना बायडेन यांनी म्हटलं.

अमेरिकेचं सैन्य युक्रेनच्या मदतीला नाही

रशियानं युक्रेनवर केलेल्या हल्ल्यामुळे अमेरिकेचा जळफळाट होत असला तरी अमेरिकेनं युक्रेनमध्ये मात्र आपलं सैन्य तैनात केलेलं नाही. ‘नाटो’च्या प्रत्येक इंच जमिनीचे संरक्षण केले जाईल या आपल्या वचनाचा बायडेन यांनी पुनरुच्चार केला. परंतु ‘नाटो’मध्ये सामील होण्याच्या इच्छेमुळे ही परिस्थिती ओढावून घेणाऱ्या युक्रेनमध्ये अमेरिकेचं सैन्य तैनात केलं जाणार नाही. russia ukraine news : सावधान रशिया! १०० लढाऊ विमानं, १२० युद्धनौका हाय अलर्टवर, ‘नाटो’चा इशारा
Indian Student Stranded in Kyiv: कीवमध्ये अडकले भारतीय विद्यार्थी, युद्धाचा प्रत्यक्ष थरारक अनुभव कथन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here