भाजपकडून आपलं सरकार नसलेल्या राज्यांना केंद्रीय तपास यंत्रणांमार्फत त्रास दिला जात आहे. भाजपचे नेते हे काय धुतल्या तांदळासारखे स्वच्छ आहेत का? भाजपचे नेते पापं करतात आणि नंतर गंगेत स्नान करतात. त्यामुळे ‘गंगा मैली’ झाली आहे.

 

Sanjay Raut ED (1)

संजय राऊत, शिवसेना खासदार

हायलाइट्स:

  • भाजपची सत्ता नसलेल्या राज्यांमध्ये केंद्रीय तपासयंत्रणा आणि राजभवनाचा गैरवापर
  • मुंबई महानगरपालिका निवडणुकीची प्रक्रिया लवकरच सुरु होईल
मुंबई: महानगरपालिकेची निवडणूक जवळ येऊन ठेपली आहे. त्यामुळे आता केंद्रीय तपास यंत्रणा मुंबई महानगरपालिकेतील शिपायांच्या घरीही धाड टाकायला कमी करणार नाहीत, अशी खोचक टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली. आयकर विभागाने शुक्रवारी सकाळी पालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घरी धाड टाकली. या पार्श्वभूमीवर संजय राऊत मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी संजय राऊत यांनी भाजपवर सडकून टीका केली. सध्या अत्यंत खालच्या दर्जाचे राजकारण सुरु आहे. भाजपची सत्ता नसलेल्या राज्यांमध्ये केंद्रीय तपासयंत्रणा आणि राजभवनाचा गैरवापर सुरु आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला. ( Shivsena MP Sanjay Raut slams BJP over income tax raid on Yashwant Jadhav)
Kirit Somaiya: यशवंत जाधवांची UAE मध्ये बेनामी कंपनी; काळ्या पैशातून मुंबईतील अनेक जुन्या इमारती विकत घेतल्या: सोमय्या
यावेळी संजय राऊत यांना यशवंत जाधव यांच्यावरील कारवाईविषयी विचारण्यात आले. त्यावर राऊत यांनी म्हटले की, मुंबई महानगरपालिका निवडणुकीची प्रक्रिया लवकरच सुरु होईल. त्यामुळे आता केंद्रीय तपासयंत्रणा महापालिकेतील शिपायांच्या घरीही धाडी टाकू शकतात. महापालिकेतील अनेक शिपाई शर्टाच्या खिशावर धनुष्यबाणाचं चिन्ह लावतात. मराठी माणूस आणि शिवसैनिक असल्यामुळे ते धनुष्यबाणाचं चिन्हं लावतात. त्यामुळे उद्या त्यांच्या घरावरही धाडी पडू शकतात. केंद्रीय तपास यंत्रणांकडून खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत. २०२४ पर्यंत महाराष्ट्र, झारखंड, पश्चिम बंगाल, छत्तीसगढ आणि पंजाबला अशा कारवाया सहन कराव्या लागतील. भाजपचे नेते डर्टी पॉलिटिक्स करत आहेत, अशी टीका संजय राऊत यांनी केली.
Yashwant Jadhav Income Tax Raid: शिवसेनेला मोठा धक्का; स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घरावर धाड
भाजपकडून आपलं सरकार नसलेल्या राज्यांना केंद्रीय तपास यंत्रणांमार्फत त्रास दिला जात आहे. भाजपचे नेते हे काय धुतल्या तांदळासारखे स्वच्छ आहेत का? भाजपचे नेते पापं करतात आणि नंतर गंगेत स्नान करतात. त्यामुळे ‘गंगा मैली’ झाली आहे. मात्र, तुम्ही केंद्रीय तपास यंत्रणा किंवा सुरक्षादलांना आमच्या दारात उभे केले, आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला तरी आमच्या तोंडातून जळजळीत सत्यच बाहेर पडणार. आम्ही निर्भय आणि बेडर आहोत, असे संजय राऊत यांनी सांगितले.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : shivsena mp reaction on income tax raid on shivsena bmc standing committee chief yashwant jadhav house in mumbai
Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here